पुण्यातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 18:34:21 GMT+0530 (India Standard Time)

पुण्यातील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग पुणे : खेकडा म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. याला कारण म्हणजे, त्याचा असणारा आकार, त्याचा येणारा वास. त्यामुळे अनेक जणांना खेकडा हा फक्त बघायला आवडतो. मात्र, येत्या काही दिवसात खेकडा खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे खेकड्याची मागणी देखील वाढू लागली आहे. पण, खेकड्याची सुद्धा शेती केली जाते. दौंड तालुक्यातील बाप लेकाने असाच खेकड्यांच्या शेतीचा भन्नाट प्रयोग केला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आहे. खेकड्याच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे.

दौंड तालुक्यातील यवत येथील राजेंद्र ननावरे व त्यांचा मुलगा कुलदीप ननावरे यांनी शेतात खेकड्याची शेती सुरू केली आहे. बाजाराचा अभ्यास करून भरघोस नफा कमावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खेकडे पकडणे ही एक कला आहे पण त्याचबरोबर त्यासाठी खूप मेहनत आणि धाडसही लागते. त्यामुळे काही खास लोकच खेकडे पकडताना दिसतात. मात्र, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत खेकड्यांचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात होत नाही. याचा विचार करून ननावरे बाप लेकानी खेकड्याच्या शेतीचा अभ्यास करून हा प्रयोग केला आहे.

हा शेतीचा प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत. त्यांना ननावरे हे योग्य मार्गदर्शन करत असतात. शेतीला जोड धंदा म्हणून खेकड्यांची शेती हा उत्तम पर्याय असल्याचे ते सर्वांना सांगतात. तरुणांनी खेकड्याची शेती करावी, त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, छोटे मोठे शेतकरी देखील हा व्यवसाय करु शकतात.

शेतात ४० फूट रुंद व ५० फूट लांब व ११ फूट खोल हौद तयार करण्यात आला. वाळूचे खडे, मोठे डबर, चिकणमाती, बारीक वाळू, योग्य प्रमाणात आणि योग्य मांडणीने भर घातली. त्यात पाणी साठवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे खेकड्यांना योग्य अधिवास निर्माण झाला. यामध्ये टप्प्याटप्प्याने सुमारे एक टन खेकडे सोडण्यात आले. इंदापूर, भिगवण, भोर, खडकवासला अशा विविध ठिकाणांहून हे खेकडे आणण्यात आले आहे. या सर्व खेकड्यांची अंदाजे संख्या पाच ते सहा हजार आहे.

खेकड्यांना खाण्यासाठी आठवडी बाजारातील टाकाऊ भाजीपाला, हॉटेलचा कचरा, शिजवलेला भात, चिकन सेंटरमधून कोंबड्यांचे अवशेष माफक प्रमाणात दिले जातात. ननवरे यांनी हे खेकडे कमी किमतीत खरेदी केले आहेत. त्यांची योग्य पद्धतीने जोपासना केली जात आहे. दिवाळीनंतर मांसाहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. या काळात पूर्ण वाढ झालेले खेकडे विक्रीसाठी काढले जाणार आहेत. थोडी मेहनत आणि योग्य नियोजन करून खेकडे वाढवल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.