हिवरेबाजारला हवी पर्यटकांच्या सुविधेसाठी मदत

By : Polticalface Team ,Wed Nov 02 2022 19:44:50 GMT+0530 (India Standard Time)

हिवरेबाजारला हवी पर्यटकांच्या सुविधेसाठी मदत अहमदनगर : आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेटी देणार्‍या पर्यटकांचं प्रमाण वाढले आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावात उपक्रम सुरू आहेत. मात्र, त्यासाठी उपलब्ध होणारा निधी तुटपुंजा असल्याने, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना माहिती देणे, याचा आर्थिक भार सोसेनासा झालाय. त्यामुळं राज्य शासनानं हिवरे बाजारला येणार्‍या पर्यटकांसाठी सामाजिक दायित्व म्हणून कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी हिवरे बाजार ग्रामस्थांनी करून तसा ठराव ग्रामसभेत केलाय.

हिवरे बाजार गावात सोमवारी (दि.31) राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, महावितरणचे उपअभियंता के. बी. कोपनर, तालुका महिला बचतगट समन्वयक पंढरीनाथ ठाणगे, सरपंच विमल ठाणगे, सेवा संस्थेचे चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा.चेअरमन रामभाऊ चत्तर, एस.टी.पादिर, रो. ना. पादीर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेत प्रामुख्याने दररोज हिवरे बाजार येथे विविध विकासकामे पाहण्यासाठी येणारे पर्यटक व त्यांची व्यवस्था, यावर सविस्तर चर्चा झाली. दररोज राज्यातील व परराज्यातील शैक्षणिक सहली, विविध संस्था, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ व कॉर्पोरेटमधून जवळपास 400 ते 500 पर्यटक हिवरे बाजारला भेट देतात. ग्रामपंचायतीचं उत्पन्न तुटपुंज असून, घरपट्टीतून प्रतिवर्षी 2.50 लाख एव्हढंच उत्पन्न मिळतं. पर्यटक आल्यावर त्यांच्यासाठी स्वच्छतागृह व पर्यटकांनी टाकलेला कचरा गावात मोठ्या प्रमाणावर तयार होतो. तसेच, वनक्षेत्रात रखवालदार नसल्यामुळं सहलीकडून आगी लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. त्याचा संपूर्ण ताण हा ग्रामपंचायतीवर येतो.

ग्रामपंचायतीला फक्त एकच कर्मचारी असल्यामुळे त्याला सर्व सहलींना माहिती देणे शक्य होत नाही. पूर्वी सहलीकडून नाममात्र स्वरूपात रक्कम आकारणी केली जात असे व त्यातून दरमहा 25 ते 30 हजारांची रक्कम जमा होत असे. त्यातून गावतीलच 4 कार्यकर्ते दरमहा 8 हजार रुपये मानधनावर पर्यटकांना माहिती देण्याचे काम करत होते. तसेच, सुरुवातीला गावातील विविध पाणलोट विकासकामे करण्यासाठी यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेमार्फत राज्याच्या आदर्श गाव योजनेतून शेजारील काही गावांमध्ये विविध विकासकामे करण्यात आली. त्या कामातून आस्थापना म्हणून प्राप्त झालेली रक्कम मानधन म्हणून देण्यात आली. परंतु, सध्या संस्थेचे कामकाज बंद असल्यामुळे आस्थापना मिळणे बंद झाले आहे.

मध्यंतरी कोविडच्या कालखंडात पर्यटकांकडून नाममात्र स्वरूपात आकारली जाणारी फी बंद करण्यात आली. त्यामुळे माहिती देण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना मानधन देणे बंद झाल्यामुळे ते स्वत:ची शेती व दुग्धव्यवसायाकडे वळले. त्यांना पूर्णवेळ काम करणे शक्य राहिले नाही. सध्या भेटी देणार्‍या पर्यटकांचे प्रमाण वाढल्याने त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे शक्य होत नाही. दूरवरून येऊनही त्यांना माहिती मिळत नाही, निवासाच्या सुविधा मिळत नाहीत आणि नाममात्र स्वरूपात फी आकारणी केल्यास ‘टोल लावता काय’, अशा प्रतिक्रिया ऐकून घ्याव्या लागतात. त्यामुळे राज्य शासनाने हिवरे बाजारला येणार्‍या पर्यटकांसाठी सामाजिक दायित्व म्हणून कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.