गुजरात विधानसभेचे बिगुले वाजले !; दोन टप्प्यात होणार निवडणूक

By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 14:33:19 GMT+0530 (India Standard Time)

गुजरात विधानसभेचे बिगुले वाजले !; दोन टप्प्यात होणार निवडणूक नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून, 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत.
50 टक्के मतदान केंद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. 51,782 मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी 948 मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 3.24 लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सुरुवातीला आयोगाकडून मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. 2017 प्रमाणे पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 25 ऑक्टोबर 2017 मध्ये निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. 14 नोव्हेंबरला अधिसूचना काढण्यात आली तर 20 नोव्हेंबरला दुस-या टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यात 89 तर दुस-या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल 9 डिसेंबर तर 14 डिसेंबरला दुस-या टप्प्यातील निकाल जाहीर करण्यात आले होते.
गुजरातमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली 2002 च्या निवडणुका जिंकल्यानंतर 2007, 2012 तिन्ही वेळा भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती. 2017 च्या निवडणुकांमध्ये भाजपने निवडणूक जिंकली मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत अनेक जागांवर आघाडी मिळवली. 2017 ची निवडणूक जिंकणे हे मोदींसाठी प्रचंड प्रतिष्ठेचे बनले होते. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला 100 च्या आत 99 जागांवर समाधान मानावे लागले होते.
गेल्या 24 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपने आपली सत्ता राखली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती तरी देखिल संघर्षपूर्ण लढतीत भाजपने निवडणुका जिंकल्या होत्या. गेल्या वेळी गुजरातमध्ये भाजपला फक्त काँग्रेसचेच आव्हान होते. मात्र, यावेळी आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी ताकद लावली आहे.
आपने यापूर्वी दिल्ली आणि पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. यासाठी आपने गेल्या अनेक दिवसांपासून गुजरातमध्ये पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. पंजाबमधील कॅम्पेन आपने गुजरातमध्येही चालवले आहे. तुम्हीच ठरवा कोण असावा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, हे कॅम्पेन सुरू केले आहे. त्यामुळे यंदाची गुजरात निवडणूक लढत ही तिरंगी होणार आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न