दौंड तालुक्यातील मौजे वाखारी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, विरोधात २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा

By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 15:31:25 GMT+0530 (India Standard Time)

दौंड तालुक्यातील मौजे वाखारी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, विरोधात २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०३ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे वाखारी ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक आणि गाव कारभारी यांचा मनमानी कारभार विरोधात स्थानिक नागरीक गुलाब कृष्णा जगताप यांनी दि ३१/ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हाधिकारी पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती दौंड तसेच संबंधित विविध राजकीय कार्यालय येथे २६ नोव्हेंबर संविधान दिना दिवशी पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा गुलाब कृष्णा जगताप रा वाखारी ता दौंड जिल्हा पुणे यांनी निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनाला दिला आहे, वाखारी ग्रामपंचायत येथील दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्त्याचे कामासाठी आठ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र वाखारी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, दलित वस्ती मधिल सिमेंट काँक्रीट रस्ता मागासवर्गीय दलित वस्ती या ठिकाणी न करता इतर ठिकाणी निधीचा वापर करून तयार केला आहे

वाखारी ग्रामपंचायतीने मनमानी पद्धतीने व पदाचा गैरवापर करून दलित नागरिकांवर अंन्याय केला जात असल्याने वाखारी ग्रामपंचायत विरोधात स्थानिक नागरिक गुलाब कृष्णा जगताप यांनी या संदर्भात विविध कार्यालयात सदर प्रकरणी तक्रार केली असुन, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत दलित वस्ती ऐवजी इतर ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दलित वस्तीतील रस्त्याचा गैरप्रकार होत असल्याने सदर प्रकरणी तक्रार व चौकशी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने,जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण अधिकारी, प्रवीण कुरुंगवंतीवार या तीन सदस्य समितीने वाखारी ग्रामपंचायत दलित वस्ती येथे दि,०२ रोजी स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते, स्थळ पाहणी दरम्यान रस्त्यापासून साधारण तीनशे फूट अंतरावर एक दलित कुटुंबातील नऊ सदस्य लोक राहत आहेत, हिलाच आम्ही दलित वस्ती म्हणतो असे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे असल्याचे, चौकशी दरम्यान आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले, वाखारी ग्रामपंचायत हद्दीतील मुळ दलित वस्ती मध्ये एकुण १७६ दलित कुटुंबातील लोक राहत आहेत, मात्र त्या ठिकाणा पासून दोन ते अडीच हजार फूट लांब अंतरावर असलेले नऊ लोकांचे कुटुंब राहत आहे,यालाच आम्ही दलित वस्ती म्हणतो असे वाखारी ग्रामपंचायतचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषद पुणे समाज कल्याण अधिकारी यांनी प्रथम दर्शनी स्थळ पाहणी करत असताना ग्रामपंचायती कडे गावठाण नकाशा दलित वस्ती नकाशा असा महसुली कोणताही पुरावा नसल्याचे आढळून आले नसल्याने जिल्हा परिषद अधिकारी समितीने ग्रामपंचायत शिरे बुक मध्ये नोंद केली आहे.

वाखारी ग्रामपंचायत प्रशासन कारभारी व पदाधिकारी दोन तोंडी बोलत आहे, आठ महिन्यापूर्वी विद्यमान सौ सरपंच यांचे पती श्री धनाजी नागोजी शेळके यांनी दि, १४/११/२०१९ रोजी जिल्हाधिकारी न्यायालयात, वाखारी ग्रामपंचायत सदस्य अतुल पोपट आखाडे यांनी सरकारी गायरानामध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी केली होती, त्या वेळी ग्रामपंचायतीने शिंदे वस्ती सरकारी गायरान जागेमध्ये असल्याबाबत सर्व पुरावे सादर केले होते, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारी यांच्या मर्जीतील दलित सदस्य नसल्याने हा अतिक्रमण गायरान जागेमध्ये शिंदे वस्तीत घर असल्याने त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि,१४/०१/२०२२, रोजी वाखारी ग्रामपंचायत ता दौंड जिल्हा पुणे, सदस्य अतुल पोपट आखाडे यांना ग्रामपंचायत सदस्य पदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण समिती अधिकारी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधीचा गैरवापर झाल्याने चौकशी दरम्यान आल्यावर वाखारी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच व ग्रामसेवक हे दुटप्पी भूमिका घेऊन सदर शिंदे वस्ती गावठाणात असल्याचा दावा करीत असुन सदर पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण समिती अधिकारी यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, वाखारी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक आणि संबंधित गाव कारभारी जाणिवपूर्वक शिंदे वस्ती दलित वस्ती विकास कामात दलित वस्तीच्या नावाखाली जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करत आहेत, त्यामुळे सदर प्रकरणी प्रशासनाने कसून चौकशी करावी, अशी तक्रार व मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात दि,३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सखोल चौकशी करण्यात यावी तसे न झाल्यास कार्यालयासमोर तक्रारदार गुलाब कृष्णा जगताप यांनी दि २६ नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.