दौंड तालुक्यातील रेल्वे प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे याना आमदार राहुल कुल यांनी दिले निवेदन
By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 17:07:36 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता,०३नोव्हेंबर २०२२, दौंड तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुराव्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री. रावसाहेबजी दानवे पाटील साहेब यांची आमदार राहुलदादा कुल यांनी मुंबई येथे भेट घेतली असुन, पुढील चर्चेसाठी दानवे यांनी दिल्ली येथे भेटीसाठी वेळ दिली होती, आमदार राहुलदादा कुल यांनी दिल्ली येथे माननीय दानवें साहेबांची भेट घेतली व मध्य रेल्वे विभाग, दौंड शहर व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली यावेळी आमदार राहुलदादा कुल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीसाठी स्वतः दानवे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात दौंड तालुक्यात बैठक व स्थळपाहणीचे आयोजन करण्याचे ठरले.
बैठकी मध्ये पुणे -दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मागण्या व विविध समस्यांउपस्थित केल्या त्यामध्ये प्रामुख्याने - दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी.
माननीय मंत्री महोदयांच्या आदेशाने दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे.
पुणे सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे उर्वरित तांत्रिक काम तात्काळ पूर्ण करून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावी.
खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाण पूल उभारण्यात यावा तसेच कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून त्याठिकाणी पाण्याच्या निचरा होण्यास होत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात यावेत.
दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत.
दौंड - पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात यावेत व पुणे - हैद्राबाद - पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई - चेन्नई - मुंबई सुपरफास्ट, LTT - विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा.
वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे - दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर ,उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी.
आदी मागण्या आमदार राहुलदादा कुल यांनी यावेळी केल्या सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेबजी दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, यावेळी आमदार श्री. जयकुमार (भाऊ) गोरे उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद