महिला रूग्णांशी अश्लील वर्तन करणा-या डाॅ.अशोक बांगर यांची नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्ति रद्द करण्यासाठी ठिय्या आंदोलन :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Thu Nov 03 2022 21:51:38 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी :महिलांशी रूग्णांशी असभ्य वर्तण प्रकरणात दोषसिद्ध डाॅ.अशोक बांगर यांची नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्ती रद्द करण्यात यावी तसेच जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी त्रिसदस्यीय समितीद्वारे डाॅ.अशोक बांगर दोषीसिद्ध असुन त्यांच्या निलंबनाची शिफारस करून सुद्धा या गंभीर प्रकरणात मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांनी डाॅ.अशोक बांगर यांच्या गैरकृत्यावर पांघरूण घालून गुन्हेगाराला पाठीशी घालत निलंबनाऐवजी अभय देऊन कोणतीही बदलीची तरतुद नसताना उपजिल्हारुग्णालय गेवराई याठीकाणी बदली केल्याबद्दल विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०२ नोव्हेंबर २०२२ वार बुधवार रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कुटीर रूग्णालय नेकनुर येथे "ठीय्या आंदोलन "करण्यात येत आहे,आंदोलनात संतोष भोसले,संजय खामकर,आनिल माने,गौतम घडशिंगे,प्रदिप वाघमारे,अमोल खामकर उपसरपंच वडगाव आदि सहभागी होते. निवेदन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे,नेकनुर पोलीस स्टेशन एपीआय शेख मुस्तफा,वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अशलाक शिंदे व नेकनुर आधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून सदर प्रकरणात ४ दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात असे लेखी आश्वासन दिल्यानंतर "ठिय्या आंदोलन "मागे घेण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
डाॅ.अशोक बांगर हे कुटीर रूग्णालय नेकनुर येथे कार्यरत असताना मद्यपान करून धिंगाणा घालणे,रूग्णांशी गैरवर्तन तसेच वैद्यकीय अधिक्षक आणि अध डाॅक्टर,कर्मचारी यांना राजकीय पुढा-यांचे नाव सांगून दादागिरी करून दहशतीचे वातावरण निर्माण करणे तसेच महिला रूग्णाला खोलीत बोलाऊन आतुन कडी लावून तपासणीच्या नावाखाली अश्लील चाळे करणे आदि घटना घडलेल्या होत्या परंतु तक्रार करण्यास कोणीही धजावत नव्हते.
डाॅ.अशोक बांगर यांच्या निलंबनासाठी जिल्हारूग्णालय बीड येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते
फेब्रुवारी २०२२ महिन्यात एका महिलेने नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अशलाक शिंदे यांच्या समोर डाॅ.अशोक बांगर यांनी कशाप्रकारे गैरवर्तन केले याची आपबीती सांगितली होती त्याचा व्हिडीओ सुद्धा प्रसारमाध्यांकडे उपलब्ध आहे. यासंदर्भात विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर डाॅ.अशोक बांगर यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ल,अड.संगीता धसे,अड.संजीवनी राऊत,किस्किंदाताई पांचाळ,अश्विनी झणझणे,वर्षाताई कुलकर्णी,विद्या सेलुकर,शुभांगी कुलकर्णी,स्वप्नील गलधर,युनुस शेख,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन,परमेश्वर लोंढे,डाॅ.संजय तांदळे,श्रीकांत गदळे आदिंनी सहभाग घेतला होता. जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्रिसदस्यीय समिती नेमली होती.
जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांचा निलंबनाचा प्रस्ताव असताना अजित पवार यांनी अभय देत केवळ बदली केली
त्रिसदस्यीय समितीत महिलेने राजकीय दबावापोटी साक्ष दिलेली नसली तरी नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक,डाॅक्टर व महिला व पुरूष कर्मचारी यांच्या साक्षी नोंदवल्या होत्या त्यावरून डाॅ.अशोक बांगर दोषीसिद्ध झाले होते. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांना पाठवला होता. तेव्हा सदर प्रकरणात घटनेचे गांभीर्य ओळखून गंभीर दखल घेण्याऐवजी डाॅ.अशोक बांगर यांच्या गैरकृत्यावर पांघरूण घालून गुन्हेगाराला पाठीशी घालत निलंबनाऐवजी अभय देऊन कोणतीही बदलीची तरतुद नसताना उपजिल्हारुग्णालय गेवराई यांठिकाणी नियुक्ती देण्यात यावी अशी टीपन्नी केली होती त्या टीपन्नीवरून डाॅ.सुरेश साबळे यांनी डाॅ.अशोक बांगर यांची उपजिल्हारुग्णालय गेवराई येथे प्रतिनियुक्ती केली होती.संबधित प्रकरणात मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांची भुमिका बेजबाबदार पणाची व मनमानी कारभार करणारी असुन महिलांवरील गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना अभय देण्याची असुन संबधित प्रकरणात त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येऊन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
नेकनुर कुटीर रूग्णालयातील विरोधात साक्ष देणारे आधिकारी महिला-पुरूष कर्मचारी दहशतीखाली
संचालक आरोग्य सेवा,आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय आधिका-यांना मुळपदी स्थापना देण्यात यावी या आदेशाने दि.३१ ऑक्टोबर २०२२ रोजी डाॅ.सुरेश साबळे यांनी डाॅ.अशोक बांगर यांची कुटीर रूग्णालय नेकनुर येथे नियुक्ति दिलेली आहे परंतु डाॅ.अशोक बांगर यांचा राजकीय पुढा-यांशी संबध सांगून दबावतंत्र वापरून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा ईतिहास पाहता त्यांच्या विरोधात साक्ष दिलेल्या वैद्यकीय अधिक्षक,डाॅक्टर तसेच महिला व पुरूष कर्मचारी यांना भविष्यात शारीरिक व मानसिक त्रास होण्याची दाट शक्यता असुन नेकनुर येथील नागरीकांची डाॅ.अशोक बांगर यांच्या नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्तीला तिव्र विरोध असुन जनमताचा आदर करता डाॅ.अशोक बांगर यांची कुटीर रूग्णालय नेकनुर येथील नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी.
स्रोत :
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद