By : Polticalface Team ,Fri Nov 04 2022 11:06:20 GMT+0530 (India Standard Time)
या फीचरद्वारे आता ग्रुपमध्ये 1024 सदस्यांना सहभागी करता येणार आहे. तसेच व्हिडिओ कॉलवर 32 जण सहभागी होणार आहेत. यासंदर्भात मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली आहे. फक्त एवढंंच नाहीतर 2 जीबीपर्यंत व्हिडिओ, फोटो आणि डॉक्युमेंट शेअर करता येणार आहे. त्याचबरोबर ग्रुपमधील सदस्याला यामध्ये आपलं मत देखील नोंदवता येणार असून इनचॅट पोलदेखील घेता येणार आहे.
व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या मेटाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकद्वारे ही माहिती दिली. व्हॉट्सअॅपवर कम्युनिटी ही नवी सेवा देण्यात येणार असून त्यात ग्रूप आणि सब-ग्रूप करणे शक्य होणार आहे. तसेच या समाजमाध्यमाद्वारे विविध जनमत (पोल) घेण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. नव्या बदलांबाबत एप्रिलमध्येच घोषणा करण्यात आली होती. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून येत्या काही आठवडय़ांत सर्व वापरकर्त्यांना टप्याटप्याने या सुविधा उपलब्ध केल्या जातील. दरम्यान, हे फिचर कसं दिसेल? फीचरच्या कार्यक्षमतेबाबत माहिती अद्याप कंपनीकडून उघड करण्यात आलेली नाही वाचक क्रमांक :