शेडगाव सटल व राशीन मुक्कामी बस चालू करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष , श्रीगोंदा यांचे वतीने सोमवार दि . ०७/११/२०२२ श्रीगोंदा आगाराचे गेट बंद आंदोलन.
By : Polticalface Team ,Fri Nov 04 2022 13:59:15 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :
श्रीगादा शेडगाव सटल, श्रीगोंदा - राशिन मुक्कामी बससेवा सुरु करणे साठी श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव , चांडगाव , टाकळी कडेवळीत , शेडगाव या गावातून श्रीगोंदा येथे शिक्षणासाठी सुमारे ८० ते ९ ० विद्यार्थी शाळेसाठी दररोज ये-जा करत अहेत . तसेच काही विद्यार्थ्यांनी प्रवासासाठी श्रीगोंदा आगाराकडून रितसर पास देखील काढले आहेत . परंतु या भागातील विद्यार्थ्यांसाठी विषयात नमुद कोणताही बस सुरु नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करणे अत्यंत अडचणीचे झाले असून त्याचा परिणाम विद्यार्थी यांच्या शैक्षणिक जीवनावर होत असून त्यांचे फार मोठे नुकसार होत आहे . तसेच या गावांतून तालुक्याच्या ठिकाणी इतर लोक देखील येत असताना त्यांना देखाल प्रवासाचे कोणतेही साधन नाही त्यामुळे त्यांचे देखील गैरसोय होत आहे . या पूर्वी श्रीगोंदा - शेडगाव बससेवा चालू होती परंतू कोरोनापासून सदर गाड़ी बंद झाली आहे . आता विद्यार्थ्यांचे शाळा , कॉलेज चालू झाले आहेत तसेच इतर प्रवाशांचा कामानिमित्त प्रवास देखील चालू झाला आहे त्यामुळे सदरची बससेवा चालु करण्यात यावी . तसेच याच मार्गावरून श्रीगोंदा - राशिन ही मुक्कामी गाडी चालू करावी जेणे करून या दोन बसेस चालू झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थी व इतर प्रवाशांना होईल . माधव शिवराम बनसूड प्रहार मा. शहराध्यक्ष श्रीगोंदा व हरिश्चंद्र नाना खामकर तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग त्यामुळे विषयात नमुद केल्याप्रमाणे १ ) श्रीगोंदा - शेडगाव सटल २ ) श्रीगोंदा - सशिन मुक्कामी बससेवा पूर्ववत चालू करण्यात यावी ही विनंती . सदरबाबत वेळावेळी तोंडी व लेखी निवेदने दिलेली आहेत परंतू श्रीगोंदा आगारप्रमुख यांचेकडून सदरची बससेवा अद्याप चालू झाली नाही . तरी वरीलप्रमाणे बससेवा त्वरीत सुरु करण्यात यावी ही विनंती . अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष , श्रीगोंदा यांचे वतीने सोमवार दि . ०७/११/२०२२ श्रीगोंदा आगाराचे गेट बंद आंदोलन करण्यात येईल . मग होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही श्रीगोंदा आगार प्रमुख यांचा राहील अशा प्रकारचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीन देण्यात आले.
वाचक क्रमांक :