By : Polticalface Team ,04-11-2022
यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थित होते. गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. आपने जनतेमधून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव मागितले होते. १६ लाख ४८ हजार लोकांकडून मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत कौल आला. त्यातील ७३ टक्के लोकांनी गढवी यांचे नाव सूचविले. त्यामुळे गढवी हे पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आमचा दुसऱ्या पक्षासारख्या पक्ष नाही. आम्ही जनतेकडून सूचना मागितल्या होत्या. जनतेकडून गढवी यांना पसंती दर्शविल्यानंतर त्यांचे नाव जाहीर करत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. गुजरातमधील लोकांना बदल घडवायचे असून, आप नक्कीच जिंकेल, असा विश्वास ही केजरीवाल यांनी व्यक्त केला.
चाळीस वर्षीय गढवी हे गुजरातमधील पिपलिया येथील आहे. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. केजरीवाल यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. ते तळागाळातील नेते म्हणून ओळखे जातात. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत इतर काही नावेही चर्चे होते.
आपने गुरुवारी गुजरात निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची नववी यादी जाहीर केली. आतापर्यंत घोषित उमेदवारांची संख्या 118 वर नेली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमध्ये १८२ विधानसभेच्या जागा आहेत. या राज्यात काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये लढत होत असते. यंदा आप रिंगणात आल्याने या राज्यात तिरंगी सामना रंगणार आहे वाचक क्रमांक :