शरद पवारांनी मोदींवर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे

By : Polticalface Team ,06-11-2022

शरद पवारांनी मोदींवर टीका करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे अहमदनगर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याच मुद्द्यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

विखे म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत आणताना आपण काय काय तडजोडी केल्या आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले. सत्तेसाठी तुम्ही तत्वांना डावलले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सर्वांनी पाठ फिरवली. सत्ता गेली की सर्वांनी तत्वे गुंडाळून ठेवली. म्हणूनच शरद पवारांनी मोदींवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे असा खोचक टोला विखे पाटलांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे.

नगर शहरातील एका कार्यक्रमानिमित्त विखे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील राजकारण व पीकविमा यावर भाष्य केले. यावेळी बोलताना विखे म्हणाले, पावसामुळे बळीराजचे मोठे नुकसान झाले मात्र या परिस्थितीमध्येही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली.

मात्र याबाबत मी माहिती घेतली आहे, याचा डाटा तयार करण्यात आला आहे. कृषी सहाय्यकांच्या सहीने पंचनामे तयार करण्यात आले, कृषी सहाय्यकांच्या पंचनाम्यावर ज्या सह्या आहेत व प्रत्यक्ष विमा कंपन्यांचे अधिकारी यांनी पाठवलेली यादी यामध्ये मोठी विसंगती आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तसेच शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम केले असल्याचे विखे म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीकविमा ही योजना सुरु केली आहे. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी सदर योजना कार्यरत आहे. मात्र विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या अनुषंगाने पंचनाम्याच्या बाबतीत कारवाईचे आदेश दिले आहे. यामध्ये जर काही अडचणी आढळून आल्या तर त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. मात्र पंचनाम्याची बाबतीत बहुतांश ठिकाणी तक्रारी आढळून आलेल्या नाहीत असेही विखे म्हणाले.

मात्र काही जणांनी सरसकट पंचनामे जाहीर करावे अशी मागणी केली, मात्र असं होत नाही, जिथे नुकसान झालं तेथील नुकसानग्रस्तांना 100 टक्के मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला जावा प्रश्नावर विखे म्हणाले, नुकसानग्रस्तांना शंभर टक्के मदत मिळते आहे, जे कोणी याची मागणी करत आहे त्यांनी काय दिवे लावले? उलट आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मदत आम्ही केली आहे.आम्ही मदतीचा हात आखडता घेतलाच नाही, अशा शब्दात विखेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.