राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आक्रमक आंदोलन, डमी कोश्यारींचे धोतर फेडले
By : Polticalface Team ,21-11-2022
पुणे :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद दिवसेंदिवस आणखीच चिघळत चालला आहे. विरोधी पक्ष शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मराठा संघटना राज्यपालांविरूद्ध आक्रमक झाले असून राज्यपालांना दिल्लीला बोलवून घ्या अशी मागणी करण्यात येत आहे. तर, माफी मागा नाहीतर स्वत:लाच जोडे मारुन घ्या, असा इशाराच ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने सारसबाग सावरकर पुतळा या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात एका तरुणाने कोश्यारी यांची वेषभुषा परिधान केली होती. त्याच्याभोवती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोश्यारी यांच्या यविरोधात घोषणाबाजी करत होते. कोश्यारी हाय हाय, महापुरुषांवर टीका करणारे राज्यपाल चले जाव , काळी टोपी हटवा, महाराष्ट्र बचाव अशा घोषणा करण्याात आल्या . याचवेळी आंदोलनकर्त्यांनी त्या डमीचे धोतर फेडत घोषणा दिल्या. या आंदोलनामध्ये पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ शिंदे, गणेश जी मोहिते,अमोल जी ननावरे, संजय दामोदर, प्रदीप देशमुख, मृणालीताई वाणी,पुरुषोत्तम ओव्हाळ,युवक युवती व महिला कार्यकर्त्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है., असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल म्हणाले, मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.
तेव्हापासून राज्यपालांच्या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील कोश्यारी यांच्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे. मात्र भाजपकडून त्यांची पाठराख केली जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपालांनी हे विधान कोणत्या संदर्भाने केले हे आपल्याला माहित नाही, तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यपालांना तसे म्हणायचे नसेल, असे म्हणत सारवासारव केली. तर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कोश्यारी यांच्या मनात दुसरे कोणते भाव नसल्याचं म्हणत त्यांची पाठराखण केली आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी