अजनुज मध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन, ग्रामसभेत घेतला सहभाग

By : Polticalface Team ,26-11-2022

अजनुज मध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन, ग्रामसभेत घेतला सहभाग श्रीगोंदा: तालुक्यातील अजनुज येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित,सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन झाले असून गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या कृषिदूतांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूत रोशन नवले, केदार निकम, वैभव मुंढे, राज खरजुले, वैभव तळपे, सोहेल तडवी, शिवाजी वाघमारे हे १० आठवडे गावात राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा उद्देश व रूपरेखा ग्रामस्थांना समजावून सांगितली. गावच्या सरपंचांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या अजनुजची माहिती विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. तसेच ग्रामसेवकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमास आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी गावचे सरपंच प्रगती गिरमकर,चेअरमन राजेंद्र गिरमकर,उपसरपंच विशाल कवडे,संचालक नानासाहेब शितोळे,माजी सदस्य योगेश गिरमकर,सदस्य रोहिदास करे,सदस्य नानासाहेब पवार,सदस्य मुरलीकाका गिरमकर,सदस्य चिराजी चव्हाण,ग्रामसेवक श्री गोळे एन. एच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषिदूतांना श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव या संस्थेच्या अध्यक्षा सौ.कल्याणीताई नेवसे, संस्थापक श्री.शंकरराव नेवसे, सचिव श्री. राजेंद्रजी गोरे, नोडल अधिकारी श्री.अण्णासाहेब रासकर,प्रशासकीय अधिकारी श्री.सखाराम राजळे,महाविद्यालयाचे समन्वयक श्री.प्रसाद पाटील, प्राचार्य .डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.श्री अमोल विधाते, प्रा.श्री आकाश मोरे, प्रा.श्री शिवम यादव व इतर विषयतज्ञ प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.