कृषिमंत्री अब्दुल सत्तारांच्या भाच्यावर गोळीबार? गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट.
By : Polticalface Team ,27-11-2022
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटातून जात असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली.
ही घटना घडल्यानंतर अज्ञातांकडून माझ्यावर गोळीबार केल्याची माहित अब्दुल सत्तातरांचे भाचे आसिफ खान यांनी दिलीय.
घटना कोंढव्यातील बोपदेव घाटात घडली असून गोळीबार कोणी केला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
हा गोळीबार आसिफ खान यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राज्यातील राजकारण सध्या तापलं असून शिंद गटाचे काही आमदार गुवाहाटी दौऱ्यावर असताना अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय
वाचक क्रमांक :