दौंड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे तालुका कारभारी नेत्यांचे लक्ष वेधले आहे

By : Polticalface Team ,08-12-2022

दौंड तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे तालुका कारभारी नेत्यांचे लक्ष वेधले आहे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०७ डिसेंबर २०२२, दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असल्याने तालुक्यातील तालुका कारभारी नेत्यांचे याकडे लक्ष वेधले आहे, लोणारवाडी,दापोडी, देवकरवाडी, दहिटणे, पाठेठाण, नांदूर, डाळिंब, बोरिभडक, एकूण आठ ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीने संपूर्ण दौंड तालुक्यातील राजकीय मंडळींचे वर्चस्व पणाला लागली आहे, दौंड तालुक्यातील एकूण ८० ग्रामपंचायत पैकी आठ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका पार पडणार असून यासाठी दौंड तालुका आजी माजी आमदार कुल - थोरात यांच्या कडुन रणनिती आखली जात असल्याचे पाहायला मिळत आहे, यां आठ ग्रामपंचायतवर राजकीय वर्चस्व कोणाचे असणार ? हे अद्याप गुलदस्त्यात असली तरी नेत्यांची जोमाने चिकाटी व कसोटी दिसुन येत आहे, कुल -थोरात गटाच्या परस्परविरोधी आघाड्या पॅनल आकाराला येत आहेत. यामध्ये मात्र कोणाचा पॅनल जय होणार ? आणि कोणाचा पराजय होणार ? याकडे मात्र तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार आता जनतेतुन थेट सरपंच पदी निवड होणार असल्याने दोन्ही गटातील पॅनल प्रमुखांना मात्र चांगलीच कसरत करावी लागणार आहे, दौंड तालुक्यात मात्र आठ ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात धुराळा उडाला आहे. एन थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग राखीव आरक्षणा नुसार, अधिकृत उमेदवार करण्यात गाव पातळीवर पॅनल प्रमुख नेते मंडळी पुढारी गुंतली होती. दि,०७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती, परस्पर विरोधी उमेदवार कधी माघार घेणार या प्रत्येक्षत दबा धरून कार्यकर्ते बसले होते, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उमेदवारासाठी बंधनकारक असलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? यामध्ये काही पॅनल प्रमुखांची खलबत् सुरू होती, या वेळी काही डमे उमेदवारांनी निवडणुकीतून माघार ही घेतली, तर काहीना उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजीचा सूर दिसुन येत होता, तहसिल कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांना सरपंच पदाचे उमेदवार रंजना लगड यांनी चांगलेच धारेवर धरले होते, दहिटणे ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला राखीव असल्याने सरपंच पदाचे प्रमुख दावेदार रंजना राजु लगड यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रश्न विचारला उमेदवाराने दिलेले घोषणापत्र हे सत्य आहे का ? हे आपण सांगु शकाल काय ? याची दखल अपीलात गेल्यानंतर घेतली जाणार तर उमेदवाराला अर्जात नमुद करुन दिलेल्या अटी नियम कशासाठी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत आहे असे स्पष्ट आरोप दहिटणे ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार रंजना राजु लगड यांनी केले आहेत, परस्पर विरोधी उमेदवार यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नाही, या संदर्भात त्यांनी हरकत नोंदविली होती,ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक गावात राजकीय पक्षाच्या गटांनी सोयीनुसार भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दौंड तालुक्यातील या आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि,१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, प्रचाराचा कालावधी जेमतेम थोडक्यात असल्याने पॅनल प्रमुखांच्या व गाव कारभारी यांच्या पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे, स्थानिक राजकारण,वैयक्तिक हेवेदावे, पक्षांतर्गत वर्चस्ववाद,असे अनेक परस्पर विरोधी तालुकास्तरीय नेत्यांसाठी ही बाब अडचणीची ठरत आहे. नेत्यांकडे गाव पातळीवरील गटप्रमुखांकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. या आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिशा दर्शविणाऱ्या ठरणार आहेत त्यामुळे दौंड तालुक्यातील आजी -माजी आमदार यांच्या सह, राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेऊन नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, कशा आपल्या ताब्यात मिळवता येतील या रणनितीला चालना देणारी ही निवडणूक ठरणार आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.