श्रीगोंदयात शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने निवेदन. शाईफेक आंदोलनातील युवकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत.

By : Polticalface Team ,13-12-2022

श्रीगोंदयात शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आरपीआयच्या वतीने निवेदन.

शाईफेक आंदोलनातील युवकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत. श्रीगोंदा प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र एव शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रीगोंद्याचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच शाईफेक आंदोलनातील युवकांवरील गुन्हे माघार घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगताप म्हणाले की, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्री पदी असून असे बेताल वक्तव्य त्यांना शोभत नाही. वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर झालेल्या शाही फेक आंदोलनात संबंधित तरुणांवर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले ते कोणत्याही अनुषंगाने योग्य नाहीत या अगोदर अशा कोणत्याही आंदोलनात इतक्या गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत. जाणून-बुजून तरुणांवर 307,353 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे योग्य नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाज व आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. संबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच महापुरुषांबद्दल असे कोण बेताल वक्तव्य करत असेल तर सर्व बहुजन समाज,भीमसैनिक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) त्याला कदापिही सोडणार नाही असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते जिवाजीराव घोडके, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब घोडके, शहराध्यक्ष युवराज घोडके, युवक शहराध्यक्ष चेतन ससाणे, तालुका सचिव राजू काळेवाघ, तालुका संघटक आनंद शिंदे, युवक तालुका संघटक अक्षय जाधव, शाखाध्यक्ष खांडगाव सुरेश शिंदे, गोरखतात्या घोडके, अक्षयभैय्या घोडके, राम घोडके, जॉन घोडके, विशाल घोडके, साजन घोडके,साहिल घोडके,कांता घोडके, अमोल घोडके, दीपक घोडके, बाळासाहेब घोडके, किरण मोरे, नितीन घोडके, मयूर घोडके, जुगल घोडके, योगेश घोडके, तुषार जगताप, दत्ता घोडके, सोनू घोडके, विशाल जंजाळ,अक्षय आठवले, राकेश घोडके उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी