करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील गटाने मारली बाजी 30 ग्रामपंचायती पैकी 19 ग्रामपंचायतीवर माजी आमदार पाटील गटाची सत्ता

By : Polticalface Team ,20-12-2022

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील गटाने मारली बाजी 30 ग्रामपंचायती पैकी 19 ग्रामपंचायतीवर माजी आमदार पाटील गटाची सत्ता करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आमदार नारायण पाटील गटाने बाजी मारली असून तीस ग्रामपंचायती पैकी तब्बल एकोणीस ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला आहे. करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात एकुण 30 ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा समावेश होता. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज करमाळा तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. यानंतर पाटील गटाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील जनतेचा आजही आपल्यावर विश्वास कायम असून ग्रामपंचायतीच्या स्थानिक निवडणूकात आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगले यश संपादन केले आहे. पाटील गटाची वरकटणे, गोयेगाव, हिंगणी, शेलगाव (वांगी), जिंती, पोंधवडी, अंजनडोह, वंजारवाडी, कामोणे, दहिगाव, दिवेगव्हाण,रिटेवाडी,तरटगाव, मोरवड, सोगाव, विहाळ, भिलारवाडी, पोपळज व पारेवाडी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन झाली असून या गावातील जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत व इतर खात्यातील मंत्रीमहोदय यांचे माध्यमातून ग्रामविकासाठी भरघोस निधी मिळवून देऊन संबंधित गावातील आरोग्य, रस्ते,स्वच्छता,कृषी,शिक्षण आदिसह अनेक मुलभुत सुविधां मिळवू देणे या उद्देशाने आपण वरीष्ठ पातळीवर निधीची मागणी व कामांचा पाठपुरावा करत राहणार असल्याचे ठामपणे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तसेच या यशाबद्दल संबंधित गावातील जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते व मतदार यांचेही त्यांनी अभिनंदन या प्रतिक्रिये मधून केले. आज जेऊर येथील माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयात विविध गावच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा करुन गूलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी