कोठे निघाले होते पवारांच्या भेटीला.. पण मध्येच एकनाथ शिंदेंनी गाठले!

By : Polticalface Team ,26-12-2022

कोठे निघाले होते पवारांच्या भेटीला.. पण मध्येच एकनाथ शिंदेंनी गाठले! सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील राजकारण देखील वेगवेगळे वळणे घेत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. सोलापुरातील दिग्गज राजकीय नेते राष्ट्रवादीत जात होते. जुलैमध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र, राष्ट्रवादीला गळती लागली.

अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा मार्ग बदलला. असाच एक मोठा राजकीय बॉम्ब मंगेश चिवटे यांनी रविवारी एका कार्यक्रमात फोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे असलेले आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, महेश कोठेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आगामी आमदार महेश कोठे असा उल्लेख आपल्या भाषणात केला. यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली.

महेश कोठेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी भक्कम होईल असे मानले जात होते, पण मंगेश चिवटे यांच्या वक्तव्याने सोलापूरच्या राजकारणात वेगळे चित्र निर्माण झाले. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे राजकारण व समाजकारण केलेले महेश कोठे हे नेहमी सोलापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणूकित महेश कोठेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीच तिकीट महेश कोठेंन न देता, दिलीप माने यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी महेश कोठेंनी शिवसेनेत राहून शिवसेना उमेदवार दिलीप माने विरोधात अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या दिलीप मानेंपेक्षा अधिक मत प्राप्त करून दाखवली होती.

शिवसेनेत घुसमट होत असल्यासारखे चित्र निर्माण झाल्याने ,अखेर महेश कोठेंनी महाविकास आघाडीचं सरकार असताना हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी देखील महेश कोठेंवर विश्वास दर्शवत आगामी होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देखील दिली होती.

महाविकास आघाडीची राज्यात सरकार असताना शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महेश कोठेंच्या घरी शरद पवार आवर्जून गेले होते आणि भोजन देखील केले होते. राष्ट्रवादीत महेश कोठेंसारखा मजबूत नेता आल्यावर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होईल अशा वलग्ना अनेकदा केल्या गेल्या होत्या.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून राष्ट्रवादीला एक प्रकारची मरगळ आली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकांना अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. महेश कोठे देखील क्वचितच राष्ट्रवादीच्या बैठकांना उपस्थित होत होते.

राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. महेश कोठे देखील शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. सोलापुरात लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात मंगेश चिवटे आले होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

या कार्यक्रमात महेश कोठे, सुधीर खरटमलसह आदी नेते उपस्थित होते. मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माजी महापौर महेश अण्णा कोठे, बाळासाहेबांच्या शिवसेनेतील भावी आमदार आहेत. महेश अण्णा हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महेश कोठेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश कोठेंच्या जाण्याची चर्चा सुरू असताना मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणातून गौप्यस्फोट केला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.