क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने येथे माता पालक मेळावा घेण्यात आला.
By : Polticalface Team ,05-01-2023
दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेडगाव जुने येथे माता पालक मेळावा घेण्यात आला होता माता पालक मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालकांनी सहभाग घेतला होता तसेच या कार्यक्रमात शाळेतील अनेक मुलींनी सहभाग घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपली मते व्यक्त केली व त्यांच्या विषयी माहिती सांगितली मुलींनी तसेच सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गीतांचे गायन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये काही मातांनीही आपली मते व्यक्त केली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्षा प्रकाश घोडके यांनी भूषवले. सूत्रसंचालन क्षीरसागर रंजना मॅडम यांनी केले व या कार्यक्रत महिलांना अनमोल मार्गदर्शन वैशाली परहर मॅडम यांनी अतिशय सुंदर रीतीने महिलांच्या गळी उतरेल या पद्धतीने केले .
वाचक क्रमांक :