जनता विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी.
By : Polticalface Team ,12-01-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.पंडित घोंगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . प्राचार्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने उत्कर्ष थोरात (इ.५वी) हा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. सानिका माने ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत आली होती. दोघेही सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी बोलताना सर्व विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती सांगितली. उत्कर्ष थोरात यांनी "आम्ही जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती बोलत आहोत" या भूमिकेत विद्यार्थ्यांसमोर जिजाऊंचे कार्यकर्तृत्वाचे व त्यांनी दिलेल्या संस्कारांचे अतिशय उर्जित व रोमहर्षक आवाजात व्याख्यान दिले. जिजाऊंची भूमिका साकारलेल्या कु. सानिका माने विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन याशिवाय शेंडकर अनुज, रितेश पाचपुते ,कु. साक्षी चोर, कु. दिव्या जाधव , प्रा.विजयकुमार काकडे आदींची भाषणे झाली. आपल्या अध्यक्ष भाषणात प्रा. पंडित घोंगडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. तालुका क्रीडा समितीचे सचिव श्री . हरिश्चंद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
वाचक क्रमांक :