पारगाव भिमा नदी पात्रात आढळुन आलेले चार मृतदेह निघोज, पारनेर तालुक्यातील, माती वडार समाजातील असल्याचे झाले उघड
By : Polticalface Team ,24-01-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २३ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील पारगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील भिमा नदी पात्रात सलग चार दिवस रोज एक मृतदेह आढळुन येते होते, त्यामुळे पारगाव हद्दीतील सर्व सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचा विषय बनला होता,
अखेर यवत पोलीस प्रशासनाने या संदर्भात सखोल चौकशी दरम्यान निघोज पारनेर तालुक्यातील माती वडार समाजातील एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, प्रवास दरम्यान पिकअप जीप किंवा छोटा हत्ती अशा कोणत्यातरी वाहनाने प्रवास करीत असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे, पारगाव भिमा नदी पात्रात आढळुन आलेल्या मृतांची नावे मोहन उत्तम पवार, वय ४८ संगीता मोहन पवार, वय ४५ शाम फुलवरे, वय २८ राणी शाम फुलवरे, वय २५ तसेच यांच्या सोबत चार वर्षा आतील लहान तीन मुले आहेत, सदर मृतदेह एकाच कुटुंबातील असुन रा, निघोज ता, पारनेर जिल्हा नगर येथील असल्याची ओळख पटली आहे,
त्यांच्या बरोबर असलेल्या चार वर्षाआतील तीन लहान मुलांचा अद्याप शोध लागला नाही, मात्र पोलीस प्रशासन शोध घेत आहेत.
दौंड तालुक्यातील चौफुला नगर मार्गावरील पारगाव भिमा नदी पात्रात दि,१८-२०- २१ २२- पर्यंत सलग टप्प्याटप्प्याने एका मागे एक मृतदेह भिमा नदीच्या पाण्यात आढळून आले होते.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव भिमा नदी येथे जाऊन स्थळ पाणी केली, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सदर प्रकरणी सखोल चौकशी करून अखेर अज्ञात मृतदेहांचा तपास दरम्यान निघोज ता, पारनेर जिल्हा नगर येथील माती वडार समाजातील कुटुंब असल्याचे उघडकीस आणून दिले आहे, संबंधित मृतदेह हे संशयित व अपघात नसुन आत्महत्या असल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली होती, मात्र एकाच कुटुंबातील सर्व लोक कोणत्यातरी वाहनात प्रवास दरम्यान अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे, सोमवार दि, २३ रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना या घटनेबाबत माहिती मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन समक्ष पाहणी केली, या वेळी दौंड विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, उपस्थित होते, सदर घटना ही अतिशय दुर्दैवी असुन, रोजंदारी व मोलमजुरी करून पोटाची भुक भागवण्यासाठी धावपळ सुरू असावी, याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी, स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग यवत पोलीस याचे शोध मोहीम पथक यांना रवाना केले आहेत.
निघोज पारनेर तालुक्यातील या कुटुंबांला प्रवास दरम्यान कोणी पाहिले होते काय ? किंवा या संदर्भात अधिक माहिती कोणास असल्यास तात्काळ पारनेर पोलीस स्टेशन किंवा यवत पोलीस स्टेशन, येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी