श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ४२ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

By : Polticalface Team ,25-01-2023

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ४२ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न दि.२२ लोकनेते सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापू) यांची ८९ वी जयंती निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले.श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय बापूंच्या प्रेरणेने नेहमीच सामाजिक जाणिव असणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देत असते.या सात दिवसाच्या कालखंडात व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा, सलाड स्पर्धा,मेहंदी स्पर्धा,आनंदी बाजार, फणी गेम, रक्तदान, प्रश्न मंजुषा,एकांकिका, लै भारी होम मिनिस्टर,वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ,विविध गुणदर्शन असे वेगवेगळे उपक्रम घेतले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व विविध गुणदर्शन सोहळा पार पडला.वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम व बुध्दीच्या जोरावरती जिल्हा,राज्य,राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाची कामगिरी केली आहे. तसेच महाविद्यालय पातळीवर यश संपादन केले आहे.त्यांचे यथोचित सन्मान करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या सोहळ्यात त्याचा बहुमान प्रदान केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी भूषविले.त्यानी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोंधित केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय अनेक उपक्रम घेत असते. विद्यार्थी अभ्यासा व्यतिरिक्त त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने असे उपक्रम खूप मोलाची कामगिरी करतात असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले. या सोहळ्याचे प्रमूख वक्त्या म्हणून निकिता पाटील या टीव्ही ९ च्या वृत्त निवेदिता उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या सोहळ्यासाठी प्रमूख अतिथी संस्थेचे विश्वस्त राकेश पाचपुते,प्रशांत दरेकर,भाऊसाहेब नेटके,प्रा.सुरेश रसाळ उपस्थित होते.तसेच प्राध्यापक वृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्र संचालन प्रा.शंकर गवते,प्रास्ताविक डॉ.धर्मनाथ काकडे तर आभार प्रदर्शन प्रा.सुरेश रसाळ यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी