विनापरवानगी जमाव जमा करणे मोर्चा काढणे प्रक्षोभक भाषणे करणे या कारणाने २०० जनावर गुन्हा
By : Polticalface Team ,02-02-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी ;- दि २४ रोजी श्रीगोंदा शहरातील राजमाता विजयराजे कन्या विद्यालयाच्या जवळ दुचाकीच्या कारणातून झालेल्या मारहाणीतून बस स्थानक तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात अश्या तीन ठिकाणी झालेल्या मारहाणीबाबत दोन्ही गटाकडून कोणत्याही प्रकारची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही त्यामध्ये प्रशासनाने स्वतः फिर्यादी होत तब्बल १८ जनावर गुन्हे दाखल केले याबाबत विविध ठिकाणी बैठका पार पडल्या आणि दि २७ जानेवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवत निषेध मोर्चा काढण्याचे प्रयोजन करण्यात आले त्या प्रकारचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले परंतु याबाबत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने शहर बंद तसेच निषेध मोर्चास परवानगी नाकारली तसेच सर्व संबंधितांना म्हणजे तब्बल ४० जनाला प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या तरीही आंदोलक कोणत्याही प्रकारे झुकले नाहीत ठरलेल्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी संपूर्ण श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला त्यानंतर बस स्थानक परिसरातून शनी चौक तहसील कार्यालय पर्यंत पायी निषेध मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निषेध सभा घेण्यात आली त्या सभेत पोलीस प्रशासन, अवैध धंदे तसेच मारहाणीचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला त्याच दिवशी पोलिसांनी संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले होते त्यानुसार विनापरवानगी जमाव जमा करणे मोर्चा काढणे प्रक्षोभक भाषणे करणे यानुसार १९५१ चे अधिनियम नुसार ३७ {१}, तसेच मुंबई पोलीस अधिनियम कायदा नुसार १३५,१३८ नुसार आजी माजी आमदार यांच्यासह सुमारे २०० जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत त्यामुळे कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणीही वागून कायदा हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्था आबादित राहावी यासाठी सर्वानी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
वाचक क्रमांक :