यवत पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हे संदर्भातील कागदपत्रे विना मोबदला मिळणार, फलक लावण्याचे आदेश पो नि हेमंत शेडगे

By : Polticalface Team ,04-02-2023

यवत पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हे संदर्भातील कागदपत्रे विना मोबदला मिळणार, फलक लावण्याचे आदेश पो नि हेमंत शेडगे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०३ जानेवारी २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य माणसाला दिलासा देणारी महत्वाची भुमिका घेऊन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी नागरीकांच्या हितार्थ मसत्वाचा निर्णय घेतला आहे. यवत पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हे संदर्भात नागरीकांना महत्त्वाची कागदपत्रे विना मोबदला व एक रुपया सुध्दा न घेता मिळण्या बाबत फलक बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असा फलक बोर्ड प्रतेक गाव बीट अमलदार यांच्या रुम मधे लावण्यात यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य नागरिक विविध प्रकारच्या दाखल गुन्ह्यातील कागदपत्रे संदर्भात मागणी केल्यास त्यांना विना मोबदला मागणी नुसार सर्व कागदपत्रे मिळावीत अशी संकल्पना त्यांनी व्यक्त केली आहे, त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे नागरिकांना विना कारण खेळवत ठेऊ नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतला. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलिस स्टेशन येथील बीट अंमलदार यांच्या रुम मधिल बसलेल्या नागरीकांची विचार पुस केली असता त्या वेळी एका महिलेला त्यांनी विचारले तुमचे काय काम आहे, ती महिला म्हणाली दि २६/१२/२०२२ रोजी मौजे कासुर्डी येथे अपघात प्रकरणी माझे पती चंद्रकांत हरिभाऊ काळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामासाठी मला महत्वाचे कागदपत्रे एफआर, पी एम रिपोर्ट, स्थळ पंचनामा, तसेच पी एम स्थळ पंचनामा हि कागदपत्रे मिळावीत यासाठी मी दोन दिवस झाले पोलीस स्टेशन येथे चकरा मारत आहे, असे सांगताच सदर महिलेची दखल घेऊन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी संबंधित पोलीस कर्मचारी यांना सुनावले व सदर महिलेस तत्काळ कागदपत्रे विना मोबदला देण्यात यावीत असे त्यांनी सांगितले, या वेळी ते बोलताना म्हणाले यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी दाखल गुन्ह्यातील कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांना विना मोबदला एक रुपया सुध्दा न घेता कागदपत्रे देण्यात यावीत, बीट अंमलदार विभाग रुम मध्ये विना मोबदला किंवा एक रुपया सुध्दा न घेता मागणी नुसार सर्व कागदपत्रे मिळतील असा फलक बोर्ड लावण्यात यावा, असा आदेश देण्यात आला, काही वेळातच संबंधित महिलेची दखल घेऊन अपघात मृत्यू प्रकरणी दाखल, एफ आर, स्थळ पंचनामा, पी एम, स्थळ पंचनामा, असे कागदपत्रे देण्यात आली असून, यवत ग्रामीण रुग्णालयातून सदर अपघात मृत्यू इसमाचे पी एम रिपोर्ट अद्याप मिळाला नसल्याचे त्यांनी महिलेस सांगितले, उपलब्ध कागदपत्रे मिळताच संबंधित पीढीत महीलेने पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे आभार व्यक्त केले, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना दाखल गुन्हे संदर्भात किंवा अपघात प्रकरणी जप्त वाहन महत्त्वाचे कागदपत्रे विना मोबदला मिळतील असा फलक बोर्ड लावण्यात यावा अशी सुचेना संबंधित पोलीसांना देण्यात आल्या आहेत, यवत पोलीस प्रशासनाची कार्यवाही गतीमान होऊ लागली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे, काही दिवसांपूर्वी यवत पोलीस स्टेशन येथे दोन तीन मिशिंग गुन्हे दाखल प्रकरणी अध्याप खुलासा होत नसल्याने, संबंधित नातेवाईक यवत पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी एलझरे घालत आहेत, फिर्यादी यांना तपास सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने, सदर प्रकरणी पोलिस प्रशासन शोध मोहीमेची गती वेगाने सुरू करतील असा विश्वास फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.