By : Polticalface Team ,08-03-2023
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे जवळील बरड्याचीवाडी येथील एक महिला डिलिव्हरीसाठी अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्यानं आईलाच मुलीची प्रसूती करावी लागल्याची बाब उघडकीस आली आहे .
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती कळा जाणवल्यानं रविवारी सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्या बरोबर अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते.
यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्यानं सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करनं प्रसूती करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईनं स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईनं कशीबशी तरी प्रसूती केल्याची माहिती मिळाली वाचक क्रमांक :