दौंड तालुका भिमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी, राजकीय गदारोळ उफाळु लागला

By : Polticalface Team ,17-03-2023

दौंड तालुका भिमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी, राजकीय गदारोळ उफाळु लागला दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १७ मार्च २०२३ दौंड तालुक्यातील भिमा पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरू होऊन जेमतेम कालावधी झाला असुन मागील दोन वर्ष कारखाना बंद होता, त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांना याचे मोठे नुकसान सहन करावे लागले. राजकीय क्षेत्रातील घडामोडींच्या फेर बदलाने राजकीय क्षेत्रातील भल्या भल्यांची डोकेदुखी वाढली आहे, दौंड तालुक्यातील राजकीय वादळ उफाळुन येऊ लागले असल्याचे सर्व सामान्य शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल,भिमा पाटस साखर कारखान्याचे चेअरमन असल्याने त्यांनी सभासदांचे हित पाहता भिमा पाटस सहकारी साखर कारखाना २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर करार स्वरुपात सुरू केला हि बाब सर्व सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरी राजकीय विरोधकांनी भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ५०० कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय राऊत यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भिमा पाटस सहकारी साखर कारखाना संस्थापक अध्यक्ष मधुकर शितोळे यांनी सभासदांच्या सहकार्याने कारखान्याची निर्मिती केली. कालांतराने माजी आमदार कै.सुभाष आण्णा कुल हे चेअरमन तर व्हाईस चेअरमन रमेश थोरात यांनी अनेक वर्षापासून कारखाना चालविण्यास महत्वाची जबाबदारी सांभाळली, मात्र अचानक कै सुभाष आण्णा कुल यांचे निधन झाले, त्यामुळे भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अँड राहुल कुल विराजमान झाले. कालांतराने भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. मात्र कारखान्याची परस्थिती बिकट असताना प्रस्थापित विरोधक या निवडणुकीत उतरले नसल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत अँड राहुल कुल यांचे सर्व संचालक मंडळ बहुमताने निवडून आल्याने पुन्हा चेअरमन पदाची जबाबदारी अँड राहुल कुल यांच्याकडे आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. सुप्रियाताई सुळे, तत्कालीन दौंड तालुक्यातील दौऱ्यामध्ये असताना त्यांच्या गाडीत, रमेश थोरात व अँड राहुल कुल दोघेही बसुन दौऱ्याच्या निमित्ताने फिरत होते, मात्र दोन तलवारी एका म्यानमध्ये बसवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोठ्या नेतेमंडळींनी केला हा अपवाद दौंड तालुक्यातील मतदारांनी अनुभवला असल्याचे बोलले जात आहे, त्या वेळी दौंड तालुका आमदार श्रीमती रंजनाताई कुल होत्या त्यांच्या नंतर दौंड विधानसभा निवडणुकीत अँड राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यात आली मात्र अँड राहुल कुल यांचा पराभव झाला, व अपक्ष उमेदवार रमेश थोरात बहुमताने निवडून आले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने छुपा पाठिंबा दर्शविला असल्याचा आरोप अँड राहुल कुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता, कालांतराने राहुल कुल यांनी महादेव जानकर यांच्या रासप पक्षांच्या माध्यमातून दौंड तालुका विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला व भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार व भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, तत्पूर्वी राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजप शिवसेना शिवसंग्राम रासप आरपीआय युतीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन भाजपने लोकसभा व विधानसभेत बहुमत मिळवले.भर पावसात भिजून सभा करण्यात आल्या तरी देखील पाहिजे तेवढा फायदा आघाडीला झाला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाजपला बिनविरोध पाठिंबा देऊन भाजप शिवसेना व इतर घटक पक्षात खळबळ उडवून दिली.राष्ट्रवादीचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी भाजपमध्ये जाऊन पहाटे शपथ विधी केला, या कालखंडात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, शेवटी शिवसेना भाजपा पासुन तोडण्यात त्यांना यश आले व राज्याची सत्ता प्रस्थापित करण्यात आली

काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित येऊन राज्याची सत्ता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी बसवून भाजपची सत्ता पलट झाली, राज्यातील मतदार मात्र कोरोणाच्या जाळ्यात व लॉकडाऊन मध्ये होरपळून अडकुन पडला राज्यातील प्रस्थापित राजकीय परिस्थिती बिघडली आणि शिवसेनेत फूट पडून, एकनाथ शिंदे सह अनेक आमदारांनी बंड केले, व मी पुन्हा येईल असे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकट असल्याचे बोलले जात आहे, तत्पूर्वी दौंड तालुक्यातील भिमा पाटस सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सभासदांचे हित लक्षात घेऊन करोडो रुपयांची सनद दिली असल्याची चर्चा होत आहे, तरी ही कारखान्याची परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. कर्ज बाजारी झालेला भीमा पाटस कारखाना बंद पडला, सभासदांच्या हितासाठी कारखाना २५ वर्षीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला, तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ दिवसात ऊसाचे बिल जमा होत असल्याचे सभासदांच्यात बोलले जात आहे. भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी आरोप करुन चौकशी करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, त्यामुळे दौंड तालुक्याचे आमदार अँड राहुल कुल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ठिकाणी निषेध व्यक्त करुन जोडेमारो आंदोलन केले जात आहे, मात्र याचा उलट परीनाम होत असल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असुन भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीला सामोरे जाण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.