श्रीगोंदा येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा
आरोग्य विभाग पंचायत समिती श्रीगोंदा व ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन साजरा
By : Polticalface Team ,26-03-2023
श्रीगोंदा | दि.२५ मार्च २०२३ :
आरोग्य विभाग पंचायत समिती श्रीगोंदा व ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २४ मार्च २०२३ रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. जागतिक क्षयरोग दिन सुंनदाताई होनराव विद्या मंदिर या ठिकाणी साजरा करण्यात आला.जर क्षयरोगाचे निदान झाले तर सरकार तर्फे मोफत उपचार केले जातात व ६ महिने ५०० रुपये महिना अनुदान दिले जाते. यावेळी क्षयरोगाची लक्षणे, कसा ओळखावा व क्षयरोग निदान व उपचार या विषयी विद्यार्थी, पालकांना आणि शिक्षक यांना सखोल माहिती देण्यात आली.
दरम्यान या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना यावेळी आरोग्य विभागातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. संघर्ष राजुळे सर व डॉ.नवीन यादव सर व पठाण सर व दिनकर पिसे सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वनपुरे मॅडम व चाकणे सर व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले.या सर्व कार्यक्रमासाठी मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर सर आणि ग्रामीण रुग्णालय चे अधीक्षक डॉ .सविता ससाणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :