मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या 12 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात, 23 एप्रिल 2023 रोजी मतदान नागवडे पाचपुते गट पुन्हा आमने सामने
By : Polticalface Team ,12-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढे करवाडी सेवा संस्थेची 23 येथील रोजी पुन्हा एक वर्षानंतर निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी 12 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्या निवडणुकीसाठी आता 12 जागेसाठी जवळपास 26 उमेदवार रिंगणात असून, 23 एप्रिल रोजी या संस्थेची पुन्हा अटीतटीची निवडणूक होत आहे अशी चिन्हे दिसत आहेत,. प्रामुख्याने सर्वसाधारण कर्जदारमधून:- कुरुमकर आप्पासाहेब महादेव, कुरुमकर चमक सर्जेराव, कुरुमकर जयसिंग माधवराव, कुरुमकर बाळासाहेब हौसराव, कुरुमकर राजेंद्र बबन, कोयते अनिकेत देविदास, खराडे मनाजी बारीक, खोडवे सुरेश विठोबा, चव्हाण संतोष धनाजी, चव्हाण शंकर रंगनाथ, जाधव अमोल रामदास, जाधव बाळासाहेब उल्हास, पडवळ सुभाष दादा, माने विजयसिंह गोविंद, मुंढेकर नारायण शिवराम, मस्कर महादेव सोपान, शेंडे गोरख भानुदास, हराळ भाऊसाहेब आप्पा, आधी उमेदवार कर्जदार मधून निवडले जाणार आहेत.
तर महिला राखीव मतदारसंघातून खोडवे प्रमिला मनोज, बाबर आशा बापू, भगत अंजना गोकुळ, मुंढेकर स्मिता नंदकुमार.
* अनुसूचित जाती जमाती मतदारसंघासाठी संस्थेमध्ये सभासद नसल्याने ती जागा रिक्त ठेवण्यात आले आहे. तर
* इतर मागास प्रवर्गांमधून मुरुडकर विजय बापू ,रंधवे संदीप विलास,
* विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून- गवते धनंजय माणिक, आणि गवते ज्ञानदेव पांडुरंग आदी उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिंद्र घोडके हे कामकाज पाहत आहेत
दरम्यान एक वर्षानंतर पुन्हा या संस्थेची निवडणूक होत असल्याने संपूर्ण तालुक्याचे या संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या वर्षी या संस्थेच्या निवडणुकीत नागवडे गटाचे सहा तर पाचपुते गटाचे सहा असे समसमान उमेदवार निवडून आल्याने पुढे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दरम्यान पेच निर्माण झाला होता. त्यावेळी सहाय्यक निबंधकांनी साधारणतः दोन ते तीन महिने अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीसाठी संधी देऊनही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी एकमत न झाल्याने या संस्थेचे आता पुन्हा एक वर्षानंतर पुन्हा निवडणूक होत असून, या संस्थेच्या निवडणुकीसाठी नागडे गट व पाचपुते गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने सामने उभे आहेत. या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार हे आता 23 एप्रिल रोजी समजणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.