दुध भेसळ प्रकरणी चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले....

By : Polticalface Team ,13-04-2023

दुध भेसळ प्रकरणी चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले....
श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील दुध भेसळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायधीश एन जी शुक्ल यांच्या समोर सुनावणी झाली या सुनावणीत न्यायाधीश शुक्ला यांनी पोलिसांच्या तसेच सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरत चौघांचा जामीन फेटाळला आहे. या दुध भेसळ आरोपीच्या जामीनाकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले होते. हे जामीन अर्ज फेटाळल्यामुळे दुध भेसळ आरोपीला चपरक बसणार आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या श्रीगोंदा येथील दूध भेसळ प्रकरणात आरोपींनी व्हे परमिट पावडर आणि लाईट लिक्वीड पैराफिन च्या सहायाने विनापरवान कृत्रीम मानवी आरोग्यास धोका पोहचेल असे भेसळयुक्त दुध बनविण्यासाठी त्याचा वापर करुन लोकांची फसवणुक करून सदर दुधाची स्वतःच्या आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने विक्री करत असल्याचे अन व सुरक्षा अधिकारी यांना आढळुन येताच त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत २४ जणांवर गुन्हा दाखल करत सुमारे १० आरोपींना अटक केली. अटक आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी भेसळ युक्त दुध तयार करण्यासाठी व्हे परमिट पावडर आणि लाईट लिक्वीड पैराफिन विना परवाना खरेदी करुन त्यापासुन भेसळयुक्त दुध तयार करुन स्वताच्या फायद्याकरिता विक्री केल्याचे तपासामध्ये दिसून आले. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी उमेश राजेंद्र सुर्यवंशी यांनी गुन्हा दाखल केला. तर तपास पोलीस उप निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या १० आरोपी पैकी दिपक विठ्ठल मखरे, निलेश विठ्ठल मखेरे रा. मखरेवाडी ता. श्रीगोंदा, वैभव रामदास राऊत, संदिप बबन राऊत रा. बोरुडेवाडी ता. श्रीगोंदा यांनी जमीन अर्ज दाखल केले होते. या जामीन अर्जावर जिल्हा व अति सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांच्यासमोर सुनावणी झाली. तपासी अधिकारी आणि सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जावर सक्त हरकत घेत आरोपीचा दुध भेसळ मध्ये कसा सहभाग आहे तसेच भेसळयुक्त दुध मानवि शरिरास अपायकारक आहे. तसेच या गुन्हाचे व्याप्ती मोठी आहे. त्यामध्ये अनेक व्यक्तीचा सहभाग आहे सखोल चौकशी करणे आहे असा युक्तिवाद अतिरिक्ती सरकारी वकिल विष्णुदास भोर्डे यांनी केला. जिल्हा व अति सत्र न्यायाधीशानी सरकारी वकिलाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. चौकट : दूध भेसळ प्रकरणात फरार असलेल्या १४ आरोपींपैकी सतिष उर्फ आबा कन्हेरकर रा. भानगाव, शुभम बोडखे, दीपक बापू वागसकर रा. सुरोडी, अतुल वसंत बारगुजे, रा.घोटवी, ता. श्रीगोंदा, महेश मखरे रा.मखरेवाडी, ता. श्रीगोंदा, समिर शेख, रा. राहुरी, हेमंत टेके, रा.अकलूज, सविता वैभव हांडे, रा.उमरज या आठ आरोपींनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या प्रकरणी सुनावणी चालू असून यावर अद्याप कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.