श्रीगोंदा तालुक्यातील या गावात झाले लोकसंख्येच्या 80.51% लोकांचे लसीकरण
By : Polticalface Team ,Mon Oct 11 2021 15:00:45 GMT+0530 (India Standard Time)
पेडगावचे सरपंच , उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व तरूण स्वयंसेवक यांनी सर्वांनी वेळोवेळी करोना प्रतिबंधक लसीकरणाला केलेल्या सहकार्यामुळे पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत १८ वर्षे पुढील ४०६५ लाभार्थ्यांपैकी ३२७३ लाभार्थींना लसीकरण करणे शक्य झाले आहे.
त्यामुळे पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत एकुण ८०.५१% लसीकरण झाले आहे
डॉ मोहिनी नितीन खामकर (समुदाय आरोग्य अधिकारी) उर्वरित २० % लाभार्थींना पेडगाव आरोग्यवर्धिनी केंद्र व तालुका आरोग्य विभागा च्या वतीने आव्हान केले की पुढील नियोजित लसीकरण च्या वेळी जास्तीत जास्त लाभार्थीं लसीकरण करून घेऊन स्वतः चे कुटुंब व गावाला सुरक्षित करण्यासाठी सहकार्य करावे.
जर 100 लोकांपैकी 80 लोक कोवीड लसीकरण करून घेतात व राहीलेले 20 लोक लसीकरण करून घेत नाही किंवा लसीकरणापासून पळ काढतात तेच 20 लोक या लस घेतलेल्या 80 लोकांचे जीव धोक्यात आणू शकतात किंवा पुन्हा लॉकडाऊन ला कारणीभूत ठरू शकतात. तर लस घेतलेल्या या 80 लोकांनी असे समजू नये की माझे व माझ्या कुटुंबाचे लसीकरण झाले आता मला कोरोना होणार नाही. ही सर्वांत मोठी चूक ठरेल कारण लसीकरण हे 18 वर्षापुढील लोकांचे होत आहे. त्यामुळे 0 ते 18 वर्षे वयोगटासाठी हे राहीलेले 20 लोक धोकादायक आहे. त्यामुळे या 80 लोकांची पण तितकीच जबाबदारी आहे. की माझ्यासाठी , माझ्या कुटुंबासाठी, माझ्या गावासाठी या राहिलेल्या 20 लोकांना लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना लसीकरण केंद्रावर पाठवून द्यावे आरोग्य यंत्रणेला मदत करा आणि आपल्या गावाला 100% लसीकरण कडे पूर्णत्वास नेऊया..
वाचक क्रमांक :