लिंपणगाव मध्ये डिजिटल साक्षरता प्रशिक्षण मोहीम कार्यक्रम संपन्न
By : Polticalface Team ,20-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ग्रामीण व दुर्बल भागांमध्ये बँकेच्या सुविधा पोहोचविण्याकरिता बीसी सखी कार्यरत असून ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता एमओआरडी द्वारे डिजिटल साक्षरता मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमे अंतर्गत लिंपणगाव तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष श्रीगोंदा येथे एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कॅम्पसाठी लिंपणगाव येथील निसर्ग महिला ग्राम संघ, भारत माता महिला ग्राम संघ, आणि राष्ट्रमाता महिला ग्राम संघातील सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होत्या. या महिलांना कॅम्प अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ग्रामीण व दुर्बल घटकांमध्ये बँकेच्या सुविधा पोहोचविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.BC सखी अंबिका सोमनाथ शिंदे यांनी आपल्या कार्याची महिलांना माहिती दिली.
कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा अभियान व्यवस्थापक मा.श्री सोमनाथ जगताप यांनी अभियानाची ओळख करून दिली . यानंतर जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन मा.श्री सरोदे यांनी महिलांना मार्गदर्शन करत आर्थिक समावेशन विषया संदर्भात माहिती सांगितली. कार्यक्रमासाठी उपस्थित बँक ऑफ महाराष्ट्र डेप्युटी मॅनेजर श्री सुमित अवघड आणि लोन ऑफिसर श्री म्हस्के यांनी महिलांना बँके संदर्भात मार्गदर्शन केले. ADCC बँक श्रीगोंदा फॅक्टरी शाखेचे नोडल ऑफिसर श्री सचिन बोटे सर उपस्थित होते यांनीही महिलांना विमा विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अनिता काळे मॅडम यांनी केले. तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथील श्री गाढवे श्री रंधवे श्री सरगर श्री राखुंडे श्रीम.जगताप मॅडम आणि लिंपणगावच्या CRP ताई अग्रवाल मॅडम, शिंदे मॅडम, बाबर मॅडम, सावंत मॅडम आदींसह लिंपणगावच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक :