By : Polticalface Team ,Tue Oct 12 2021 20:35:29 GMT+0530 (India Standard Time)
कोरोना महामारी मुळे श्रीगोंदा शहराची ग्रामदैवत श्री.साळवण देवी नवरात्र उत्सव यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळून साधेपणाने साजरा होत आहे.
श्री. सळवण देवीचे मंदिर 12 व्या शतकातील असून महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक मोठ्या संख्येने नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येतात. यंदा कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमाप्रमाणे मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व्यवस्थापन समिती यासाठी परिश्रम घेत आहे. तसेच मंदिराचे वंशपरंरागत पुजारी श्री. पाठक रोजची नित्य पूजा धार्मिक विधी होम-हवन केले जात आहे. दिनांक.१३.१०.२०२१ रोजी नवरात्र उत्सवातील होमदहन दुर्गा सपत्नशी पाठ केले जाणार आहे असे मंदिराचे पुजारी श्री. पाठक यांनी सांगितले.
स्रोत :- श्री.विनोद मखरे
वाचक क्रमांक :