नागवडेंचा सत्तेचा माज सभासद उतरविल्याशिवाय राहणार नाहीत - संदीप नागवडे
By : Polticalface Team ,Thu Oct 14 2021 19:34:39 GMT+0530 (India Standard Time)
एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका का काढल्या?
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना स्वर्गीय बापु यांच्या मुळे नावारुपाला आला होता पण त्यांच्या नंतर पुत्राने कारभार करताना पुर्ण बट्याबोळ केला आहे.राजेंद्र नागवडे यांना सत्तेचा माज आला आहे सभासद त्यांना आगामी निवडणुकीत जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका भाजपचे तालुका अध्यक्ष संदिप नागवडे यांनी केली. गाळप हंगामाच्या शुभारंभाची निमंत्रण पत्रिका दोन छापल्या व जेष्ठ नेत्यांची नावे टाकण्यात ही चुका केल्या आहेत या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात कारखाना कारभारावर टीका केली आहे.
आज नागवडे कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार करताना राजेंद्र नागवडे यांनी सत्तेचा वापर करून मनमानी पणा केला. राज्यात सर्वात जेष्ठ विधानसभा सदस्य आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी पाचपुते साहेब आहेत त्यांचे नाव अतिशय लहान टाकले त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या समितीचे सदस्य व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांचे एका पत्रिकेत वरच्या ओळीत नाव व दुसऱ्या पत्रिकेत खालच्या बाजूला नाव टाकले व स्वताच्या पत्नीचे नाव वरच्या ओळीत टाकले असे करुन नागवडे यांनी काय सिद्ध केले आहे ?
त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून केशवभाऊ मगर यांच्या सारखे जेष्ठ संचालक बाहेर पडले आहेत.व त्यांनी कारखान्यात चाललेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे आणि तो सत्य असून राजेंद्र नागवडे यांनी याच भ्रष्टाचारातून स्वतःच्या सहा खाजगी कंपन्या त्यातील दोन खाजगी साखर कारखाने आणि कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. याचा येत्या कारखाना निवडणुकीत पर्दाफाश करणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
या तालुक्यात राजकारण करताना आमदार बबनराव पाचपुते व स्वर्गीय शिवाजीराव नागवडे हे विरोधक होते पण तालुक्यात विकासासाठी आवश्यक तेथे एकत्र असत बापूंनी कधीच विकासात अथवा कारखाना चालवताना राजकारण केले नाही हा कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे असे बापु नेहमी सांगत पण पुत्र राजेंद्र नागवडे यांनी बापूंच्याच प्रतिमेला डाग लावण्याचा कारभार केला आहे अशा प्रवृत्तींना सभासद धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत असे संदिप नागवडे म्हणाले.
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :