श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी हॅलो अण्णा बोलतोय हे ॲप लॉन्च करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती
By : Polticalface Team ,26-04-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांसाठी हॅलो अण्णा बोलतोय हे ॲप एक मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लॉन्च करणार असून, त्यातून जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मोठी मदत होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवर्तन यात्रा सुरू असून, त्यानिमित्त 25 एप्रिल रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने श्री शेलार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री शेलार पुढे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील 153 गावांपैकी 120 गावात या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून जनतेशी सुसंवाद साधला आहे. त्यापैकी आता श्रीगोंदा शहर परिसरातील 33 गावे राहिले असून, त्या गावांमध्ये देखील परिवर्तन यात्रा लवकरच पोहोचेल, असे श्री शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्यातील 120 गावांमध्ये परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधताना त्या गावांमध्ये पुरेशी दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामध्ये रस्ते, वीज व पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा दिसून आला. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी 35 ते 40 वर्ष सत्ता भोगली. परंतु आश्वासना पलीकडे कोणतेच काम केले नाही. अशा भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसल्या. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी फक्त घोड लाभक्षेत्रात सुलभता आणली. परंतु कुकडी लाभ क्षेत्रात मात्र शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे रब्बी हंगामा पलीकडे दुसरे कोणतेही पीक या कुकडी लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना घेता आले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. असे सांगून श्री शेलार आणखी पुढे म्हणाले की, कुकडी लाभक्षेत्रात हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. मध्यंतरी अतिवृष्टी होऊन सततच्या पावसाने झालेले नुकसान न शेतकऱ्यांना न भरून येण्यासारखे आहे. अतिवृष्टीच्या अनुदानातून अनेक शेतकरी वंचित आहेत. आज ना उद्या अनुदान मिळेल यासाठी शेतकरी दररोज बँकांमध्ये जाऊन विचारपूस करत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमा अवस्थेत आहेत
असे सांगून शेलार पुढे म्हणाले की, तालुक्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना रेशनिंग वर धान्य मिळत नाही. परंतु तालुक्यातील सदन शेतकऱ्यांना मात्र दारिद्र्य रेषेच्या कार्डाच्या माध्यमातून शासकीय धान्य पुरवठा केला जातो .त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला शासकीय धान्याचा लाभ मिळत नाही. त्या संदर्भातही आमच्याकडे सर्वसामान्य नागरिक तक्रार करत आहे. लोकप्रतिनिधी मात्र या प्रश्नांना वाचा फोडत नाही. हे मोठे दुर्दैव आहे. गेली 37 वर्ष आपण राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नात सतत लक्ष घातले. काहीच करत नाही, म्हणून माझ्यावर लोकप्रतिनिधी नेहमी आरोप करतात. परंतु मी कधीच हात बांधून बसलो नाही. सतत समाजाच्या प्रत्येक सुखदुखात मी व माझे कुटुंब सक्रिय सहभागी आहोत. असे सांगून श्री शेलार आणखी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून आम्ही एक मे रोजी हॅलो अण्णा हे ॲप लॉन्स करणार आहे. त्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या तक्रारीचे निराकरण करणार आहोत. त्यातून जनतेचे सुखर प्रश्न मार्गी लागणार आहे. ग्रामीण भागांमध्ये परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून महावितरण कंपनीच्या 35 ते चाळीस वर्ष पूर्वीच्या जीर्ण विद्युत तारा सर्वसामान्य नागरिकांच्या जीव घेणे ठरले आहेत. सहज वारा आला तरी तारा तुटतात. त्यातून मोठ्या जीव घेण्या दुर्घटना देखील घडत आहेत. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी अनेक प्रश्न प्रलंबित असून, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या 35 ते 40 वर्षात अनेक एमआयडीसी सारख्या घोषणा करत. मते मागून जनतेची मोठी दिशाभूल केली आहे. त्यातून तालुक्यात तरुणांना कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही. त्यामुळे अस्वस्थता तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. असे सांगत ते आणखी पुढे म्हणाले की 1986 पासून तालुक्यात समाजकार्याला सुरुवात केली. त्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना जास्तीत जास्त संधी जनतेने दिली. प्रथम गृहराज्यमंत्री ते पालकमंत्री ही सर्वोच्च पदे मिळाली. परंतु जनतेला फक्त आश्वासना पलीकडे काहीच हाती लागले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपारिक राजकीय विरोध बाजूला ठेवत पक्ष निष्ठा व तत्व पाळली जात नाही. आता हे देखील जनतेला समजले आहे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून दावेदार असून स्पर्धेत नसतानाही विधानसभेच्या स्पर्धेत आलेलो आहे. असे श्री शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.