कोपरगाव, राहता , लोणी परिसरातून महिलांचे दागिने पळविनारी टोळी गजाआड

By : Polticalface Team ,Sun Oct 17 2021 08:55:59 GMT+0530 (India Standard Time)

कोपरगाव, राहता , लोणी परिसरातून महिलांचे दागिने पळविनारी टोळी गजाआड कोपरगाव, राहाता व लोणी परिसरामधून महिलांचे गळ्यातील दागिणे चोरणारी टोळी२,०५,०००/- रु. किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि,दि.२२/०९/२०२१ रोजी सकाळचे वेळी फिर्यादी श्रीमती संगीता गणेश देशमूख,वय-५४ वर्ष, धंदा- नोकरी, रा. साईनगर, कोपरगाव ह्या त्यांचे स्कुटी गाडीवरुन मेहता कन्या विद्यालय,कोपरगाव येथे गेल्यानंतर पाकीगमध्ये स्कुटी गाडी पार्क करीत असताना पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळ्यातील ६०,०००/-रु. किं. चे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने तोडून चोरुन नेले होते.सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 1 २९/२०२१, भादविकलम ३१२, १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच जिल्ह्यामध्ये वारंवार चैन स्नॅचिंगच्या घटना घडत असल्यामूळे मा.पोलीस अधिक्षक साो, अहमदनगर तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर व श्रीरामपूर यांचे आदेशाने श्री.अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासबाबत सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो.नि. श्री. अनिल कटके यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नागेश काळे रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई श्री. सोपान गोरे,पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोहेकों/संदीप पवार, पोन शंकर चौधरी, पोन विशाल दळवी, पोना रविकिरण सोनटक्के,पोनादिपक शिंदे, पोकों/योगेश सातपूते, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून वडाळा महादेव येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे (२) नागेश राजेन्द्र काले, वय-२० वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.परंतु नमुद गुन्हा हा त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली असल्याने दोन पंचासमक्ष त्याचे वडाळा महादेव येथील घराची झडती घेतली असता घरगडतीमध्ये दोन सोन्याचे मिनी गंठण व दोन सोन्याचे मंगळसुत्र असे ६० ग्रॅम वजनाचे दागिने मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांबाबत आरोपी नागेश काळे यास विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचे दागिने हे त्याने व त्याचे साथीदार नामे सोंड्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, रा. अशोकनगर कारखाना, संदीप दादाहरी काळे, रा. वडाळा महादेव व आणखी एक साथीदार अशांनी मिळून मागील २ महीन्याचे कालावधीमध्ये कोपरगाव शहर, राहाता शहर, लोणी-बाभळेश्वर रोड या ठिकाणाहुन रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे गळ्यातील दागिणे तोडून चोरुन आणले असल्याचे सांगितले. सदर माहितीच्या आधारे साथीदार आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी नामे २) सॉन्या उर्फ अदीत्य गणेश पिंपळे, बब-१९ वर्षे, रा. अशोकनगर कारखाना, ) संदीप दावाहरी काळे, वय-३२ वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर यांना वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यात घेतले. चौथ्या साथीदाराचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दोन सोन्याचे मिनीगंठण, दोन सोन्याचे मंगळसुत्र असे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकुण २,०५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार सदर चोरी बाबत संबधीत पो.स्टे. चे अभिलेख तपासून दाखल असलेले गुन्हे तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व आरोपीकडून ताब्यात घेतलेले दागिणे याची पडताळणी करुन खात्री केली असता खालील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.१) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.२९३/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ २) कोपरगाव शहर पो.स्टे. गुरनं.३००/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ ३) राहाता पो.स्टे. गुरनं. २३९/२०२१, भादवि कलम ३९२, ३४, ४) लोणी पो.स्टे. गुरनं.३७६/२०२१, भादवि कलम ३९२, ३४ सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री. संजय सातव साहेब , सोपान गोरे पी आय, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.