....अन्यथा बनशेंद्रा गावाचे गावकरी व शेतकरी घेणार जलसमाधी?
By : Polticalface Team ,04-05-2023
छत्रपती संभाजीनगर:(योगेश मोरे प्रतिनिधी)
बनशेंद्रा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावात अंबाडी धरणाचे पावसाळ्यात वाहून जाणारे ओव्हरफ्लोचे पाणी सोडा अन्यथा जलसमाधी घेऊ....? जनशक्ती शेतकरी संघटनेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील शेळके !
कन्नड तालुक्यातील मौजे बनशेंद्रा येथील गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावाला अंबाडी धरणाच्या चारितून ओव्हरफ्लोचे पाणी सोडा व बनशेंद्रा गावाचा पिण्याचा प्रश्न कायमचा सोडावा असे निवेदन देऊन पंधरा दिवसात यावर तोडगा न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावात कायम स्वरूपी पाणी राहावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर नल से जल! व शाश्वत पाणी पुरवठा मिळावा;म्हणुन कन्नड शहराला बारमाही पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातुन चारीद्वारे बहिरगावसह परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणारी चारी बनशेंद्रा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या चारिपासून धरणापर्यंतचे अंतर पाचशे मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे तात्काळ सर्वे करून चारी करून पावसाळ्यात वाहून जाणारे फक्त ओव्हरफ्लोचे पाणी या पाझर तलावात सोडावे व बनशेंद्रा गावाला शास्वत पाणी मिळेल याची तरतूद करावी? याकरिता जनशक्ती संघटनेचे जिल्हाद्यक्ष अनिल पाटील शेळके यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व गोदावरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात सदर प्रकरण मार्गी न लावल्यास बनशेंद्रा येथील पाझर तलावात जलसमाधी घेऊ असा निर्वानीचा इशारा दिला आहे.
दरम्यान याप्रश्नाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनाही याबाबतीत लेखी निवेदन बनशेंद्रा ग्रामपंचायत ठराव घेऊन देण्यात आलेला आहे;मात्र नामदार कराड यांच्याकडून अद्यापही याप्रकरणी सकारात्मक निर्णय न झाल्याने गावकऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेतर्फे हे निवेदन विविध सरकारी विभागाला दिलेले आहे.बनशेंद्रा गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा!अन्यथा येत्या पंधरा दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करून जलसमाधी घेण्याचा इशारा अनिल पाटील शेळके यांच्यासह जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, गावकरी बनशेंद्रा धरणात जलसमाधी आंदोलन करेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून या जलसमाधी आंदोलनादरम्यान काही जीवितहानी अथवा नुकसान झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील! याची नोंद घ्यावी असाही इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
वाचक क्रमांक :