वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, बिलावरून वाद झाल्याने हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने केला खून
By : Polticalface Team ,07-05-2023
छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी योगेश मोरे )
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाढदिवसाच्या पार्टीच्या बिलावरुन झालेला वाद तरुणाच्या जिवावर बेतला आहे. कारण बिलाच्या वादावरुन हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने या तरुणाचा तीष्ण हत्याराने वार करुन खून केला आहे. शनिवारी (6 मे) रोजी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळ ही घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या खून प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांनी गुह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संतोष जादुसिंग बमनावत (वय 28 वर्षे, रा. वांजोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर संकेत अनिल जाधव (वय 21 वर्षे, रा. भीमनगर, भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर ह. मु. स्नेहनगर सिल्लोड), गजानन यादवराव दणके (वय 24 वर्षे रा. चिंचोली नकीब ता. फुलंब्री) असे आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी डोंगरगाव फाट्याजवळील हॉटेल गारवा समोरील पाण्याच्या पाटात तरुणाचा मृतदेह काही नागरिकांना आढळून आला होता नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांनी दिली;तर याबाबत माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, तरुणाच्या डोक्यावर, हातावर तीष्ण हत्याराने वार केल्याचा जखमा दिसून येत होत्या. यामुळे खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली.त्यानुसार पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवली. सुरवातीला तरुणाची ओळख पटवली. दरम्यान आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (5 मे) या तरुणाचा वाढदिवस होता. तर वाढदिवस साजरा करुन मित्रांसोबत हॉटेल समर येथे त्याने पार्टी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्रांना विश्वासात घेत माहिती काढली. यात हॉटेल चालक व तरुणामध्ये बिलावरुन वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ संबधित हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. दरम्यान, हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने या तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याचे समोर आले. तर आरोपींनी गुह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तरुणाचा भाऊ गोवर्धन जादुसिंह मनावत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवस अखेरचा ठरला
संतोष बमनावत हा भवन येथील नॅशनल गॅरेजवर गेल्या सहा वर्षांपासून कामाला होता. तो दररोज गावाकडून ये-जा करीत होता. दरम्यान शुक्रवारी त्याने मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यानंतर हॉटेल समरवर त्यांनी पार्टी केली. मात्र यावेळी बिल देण्यावरून त्याचा हॉटेल चालकासोबत वाद झाला होता. तर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे शुक्रवारी संतोषचा वाढदिवस त्याच्यासह मित्र, नातेवाईकांसाठी अखेरचा ठरला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.