आनंदवाडी गाव मध्ये अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून तब्बल ९५ हजाराचा मुद्देमाल केला लंपास.
By : Polticalface Team ,10-05-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी या ठिकाणी म्हसोबा देवाची दि ७ मे व ८ मे रोजी यात्रा होती या यात्रेच्या दिवशी गावकरी तमाशात दंग असताना अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून तब्बल ९५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सागर विठ्ठल नांदगुडे रा. आनंदवाडी ता.श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी या ठिकाणी म्हसोबा देवाची दि ७ मे व ८ मे रोजी यात्रा होती तसेच मोठ्या प्रमाणात उकाडा असल्यामुळे ७ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करुन झोपले होते उन्हाळयाचे दिवस असल्याने घराचे छतावर जाण्यासाठी असलेला दरवाजा उघडा ठेवला होता. दि ८ मे च्या रात्री 02/30 वा चे सुमारास फिर्यादीची आई झोपलेल्या हॉलमधुन ओरडण्याचा आवाज आला त्यावेळी फिर्यादी झोपेतुन उठुन बाहेर जाण्यासाठी रुमची कडी उघडली असता ते झोपले होतो त्या खोलीचा दरवाजा उघडायला लागलो तर दरवाजा बाहेरुन बंद होता. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी फिर्यादीच्या आईने खोलीची कडी उघडली व सर्वजण बाहेर आलो त्यावेळी फिर्यादीचे आईने आम्हाला सांगितले की, मी लघवीसाठी उठले असता मला माझे गळयातील सोन्याचे दागिने दिसले नाहीत व बेडरुमचा दरवाजा उघडा दिसल्याने बेडरुमकडे जाताना मला आपले घराचे छताचे दरवाजे वाटे चोरटे पळुन जाताना दिसले असे सांगीतले. त्यानंतर सर्वानी घरात पाहणी केली असता, आमचे दुसरे बेडरुममधील कपाटात ठेवलेले व आईच्या गळयातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले त्यामध्ये 24,000/- रु किं. चे सोन्याचे गंठण 2 तोळे वजनाचे तसेच . 25,000/- रु. किं.चे सोन्याचे 1.5 तोळयाचे आक्कासाहेब डोरले, 5 वजनाची बोरमाळ, 1 गलय वेल तसेच 9,000/- रु किं.च्या 2 सोन्याच्या अंगठया प्रत्येकी 4 ग्रॅम वजनाच्या कपाटात ठेवलेल्या तसेच 5,000/- रु. किं.ची 4 वजनाची 1 सोन्याची गळयातील,४,०००/- रु. किं.ची 3 वजनाची 1 सोनाची लहान बाळाचे गळयातले बदाम,16. 3,000/- रु.किं.ची 2 वजनाची सोन्याची नाकातील नथ,25,000/- रु रोख रक्कम त्यात 100,500 च्या चलनी नोटा असा एकूण ९५ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे तसेच शेजारची२० हजार किमतीची एम एच १२क्यू एन २२४६ होंडा शाईन काळ्या रंगाची दुचाकी चोरटयांनी चोरून नेली आहे याप्रकरणी सागर विठ्ठल नांदगुडे, वय ३८ वर्षे, धंदा शेती, रा. आनंदवाडी ता.श्रीगोंदा यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवि ३८०,४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी अंगुलीमुद्रा तज्ञ स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत कन्हेरे हे करत आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.