By : Polticalface Team ,Thu Oct 21 2021 11:33:24 GMT+0530 (भारतीय मानक समय)
बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीगोंदा तहसील समोर आमरण उपोषण.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने अमरण उपोषण करण्यात आले. हे उपोषण बसपा जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, कोषाध्यक्ष श्रीगोंदा विधानसभा कचरु लष्करे, सचिव श्रीगोंदा विधानसभा मोहन काळे, स्वप्नील पवार यांच्या वतीने करण्यात आले. उपोषनातील प्रमुख मागण्या
अनुसूचित जाती- जमाती vjnt व दुर्बल घटक या भूमिहीन कुटुंबांची राहत असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना तातडीने खाते उतारे देणे. आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे कुटुंब उदरनिर्वाहासाठी अतिक्रमणे करून उपजीविकेसाठी शेती करत आहेत त्यांना तत्काळ सर्वे करून त्यांचे पंचनामे करून त्यांची सातबारा सदर ही नोंद करणे.
सरकारी शासनाचे आदेश धाब्यावर बसवून उपेक्षित वर्गाला जाणून-बुजून लाभापासून आडवी-आडवी करून उपेक्षित ठेवणार्या पदाधिकारी, कर्मचारी व राजकीय पुढारी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागण्या होत्या तहसीलदार साहेब व बिडिओ साहेब यांनी दिलेल्या शासनाच्या नियमानुसार निर्णय घेऊ या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण थांबवण्यात आले.
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :