कुसुम योजनेतील सौर ऊर्जेच्या पंपाच्या अर्जासाठी शेतकऱ्यांची दमछाक

By : Polticalface Team ,23-05-2023

कुसुम योजनेतील  सौर ऊर्जेच्या पंपाच्या अर्जासाठी शेतकऱ्यांची दमछाक
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२१/५/२०२३ पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत.

वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होईना आणि जेव्हा सुरू झाले तोपर्यंत संबंधित जिल्ह्यातील कोटा संपला, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही हजारो शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) वतीने राज्यात महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेचा पुढील टप्पा राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंपांसाठी खुल्या गटाला ९०, तर अनुसूचित जमातीसाठी ९५ टक्के अनुदान देण्यात येते.दि जिल्हानिहाय कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येणार आहे. शेतीपंपांचे सौर ऊर्जाकरण करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम योजना आणली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख १८ हजार ८९७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७० हजार ५२९ शेतकऱ्यांनी स्वहिश्शाची रक्कम भरली. तर ६९ हजार ६६९ जणांनी सौर पंप पुरवठादारांची निवड केली आहे. त्यामुळे हे पंप बसविले जातील.

खुल्या गटासाठी तीन एचपी पंपासाठी १९ हजार ३८०, पाच एचपीसाठी २६ हजार ९७५, तर साडेसात एचपीसाठी ३७ हजार ४४० रुपये स्वहिश्शाची रक्कम भरावी लागेल. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी तीन एचपीसाठी ९ हजार ६९०, पाच एचपीसाठी १३ हजार ४८८, साडेसात एचपीसाठी १८ हजार ७२० रुपये भरावे लागतील. प्रथम लाभ घेतलेल्यांना संधी नाही या योजनेचा लाभ दोन वेळा घेता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाइन अर्ज भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जाने केले आहे. अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. तर गुन्हा दाखल होणार पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात आणि लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियानांतर्गत बसवून घेतात. अशा प्रकारे कुणी पंप बसवून घेतल्यास त्याचा सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल. त्याने भरलेली लाभार्थी हिश्शाची रक्कम जप्त केली जाईल, असेही महाऊर्जाने कळविले आहे. या शेतकऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येईल.
अनेक गावे वंचित
अनेक गावांतील शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करताना अडचणी येत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावांच्या यादीतील गावांमध्येच कुसुम योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येत आहेत. अनेक गावांची नावे सुरक्षित गावांच्या यादीत नसल्याने या गावांतील सौर ऊर्जा पंप घेण्यास पात्र होत नाहीत. मात्र हे शेतकरी डिझेल पंप वापरत असतील, तर त्यांना सौरपंप बसवून देण्यात येतील, असे अर्ज भरताना सांगितले जात आहे.
*आप्पा चव्हाण*

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी