करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्ताच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षित करा पाटील गटाकडून प्रशासनाला विनंती

By : Polticalface Team ,24-05-2023

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्ताच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षित करा पाटील गटाकडून प्रशासनाला विनंती करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा-माढा तालूक्यातील शेतकऱ्याची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षीत करा अशी विनंती पाटील गटाकडून प्रशासनास करण्यात आली आहे. याबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सविस्तरपणे भुमिका मांडली. यावेळी तळेकर यांनी सांगितले की सध्या उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे चालू आहे. या पाण्याचे मोजमाप व नियोजन याचा अभाव असल्याने भरमसाठ पाणी सोडले जाते. याचा फटका करमाळा तालुक्यातील व माढा तालुक्यातील बोगद्यावरील शेतकऱ्यांना बसतो. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील गावे पाण्याखाली गेली. लवादाने धरणग्रस्तांसाठी दोन टिएमसी पाणी राखून ठेवले. पण उजनी गाळयुक्त असल्याने धरणग्रस्तांचे अधिकार त्यांना मिळवून दिले जात नाहीत. सोलापुर शहरास पिण्याच्या नावाखाली पाणी सोडले जाते, आषाढी व कार्तिकी वारी नजरेसमोर ठेऊनही नदीपात्रात पाणी सोडले जाते. पण याचे प्रमाण अधिक असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. दरवर्षी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना विनवणी करते.धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना रस्त्यावर उतरावे लागते. कारण पाणीपातळी खाली गेल्यास पाईप टाकणे, चारी खांदून पाण्यापर्यंत पोहचणे, प्रत्यक्ष पाण्यापर्यंत वीजेचे पोल उभारणे या गोष्टीचा अनावश्यक खर्च धरणग्रस्तांचे माथी पडतो. माढा तालुक्यातील बोगदाकाठी हीच परिस्थिती निर्माण होते. एवढे होऊनही महावितरणकडून वीजपुरवठा दोन तासावर आणला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा निघावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. आजमितीस करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना, धरणग्रस्तांचा उजनी पट्टा व सीना-भीमा जोडकालवा अर्थात बोगदा यावरील शेतकरी हा ऊस व खास करून केळी सारखी नगदी पिके घेत आहेत. पाण्याची मागणी भरपुर आहे. अशात उजनीतुन खाली नदीपात्रात जाणारे पाणी थांबले नाही तर शेकडो कोटी रुपयांची पिके धोक्यात येतील. यामुळे मग शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळप्रसंगी आंदोलन करावयाची वेळ आली तरी पाटील गट यास तयार असेल. उजनीच्या पाणी नियोजन समितीत धरणग्रस्तांचा एक प्रतिनिधी असावा, पाणी पातळी खाली गेल्यास प्रत्यक्ष पाण्यापर्यंत शेतकऱ्याला शासनाकडून मोफत वीजेचे पोल टाकले जावेत व तारा ओढून दिल्या जाव्यात ही मागणी यापूर्वीच माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.