By : Polticalface Team ,25-05-2023
फिर्यादी विलास दशरथ कापरे, यवत पोलीस नाईक, पुणे ग्रामीण यांनी पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर कारवाई दि,२३/०५/२०२३ रोजी मध्यरात्री मौजे कडेठाण ता दौंड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत जमीन गट नं, ५२८ मध्ये, जेसीबीच्या साहाय्याने अवैद्य मातीचे उत्खनन करत असताना व हायवामध्ये माती भरुन वाहतुक करीत असताना आढळून आले, त्या वेळी त्यांना माती चोरी प्रकरणी विचारले असता (धनंजय रावसाहेब टेंगले) मालकाच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले, असल्याचे नमूद करण्यात आले असून, सदर घटनास्थळी ३० लाख रुपये किंमतीचे विना नंबर प्लेटचे दोन जेसीबी, १० लाख रुपये किंमतीचा एक हायवा ट्रक, क्र, एम एच ४२ ए क्यू ०००९, असे ऐकून ४० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, सदर आरोपी १) कुर्बान जयनुल अन्सारी, २२ वर्ष संध्या रा वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, मुळ रा, मलकोको ता बरही जि,हजारीबाग राज्य झारखंड, २) अर्षद असगर अन्सारी, २३ वर्ष संध्या रा, वरवंड ता दौंड जिल्हा पुणे,मुळ रा, मलकोको ता बरही जि हजारीबाग राज्य झारखंड, हायवा ट्रक चालक, ३) मंगेश विनायक आमराव,२२ वर्ष रा देऊळगाव राजे, ता दौंड जिल्हा पुणे, ४) धनंजय रावसाहेब टेंगले रा, वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, ५) दगडु बाळु घुले,रा नांदुर ता दौंड जिल्हा पुणे, ६) स्वप्निल काटकर, (पूर्ण नाव माहित नाही) रा शिरापुर ता दौंड जिल्हा पुणे,सदर आरोपी विरुद्ध, गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक तजवीज ठेवण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे, यातील आरोपी ४) धनंजय रावसाहेब टेंगले, ५) दगडु बाळु घुले, याचे विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन तसेच यवत पोलीस स्टेशन येथे या पूर्वीही गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो हवा जगताप, यवत पोलीस पो हवा भानुदास बडंगर पुढील तपास करीत आहेत, यवत पोलीसांच्या या कारवाईने हद्दीतील वाळु माफीयांची चांगलीच धांदल उडाली आहे, गेली अनेक वर्षापासून कडेठाण दापोडी हातवळण वरवंड वाळकी या भागात वाळु माती माफीयांनी धुमाकूळ घातला आहे.
दौंड तहसीलदार मा संजय पाटील यांच्या बदलीची बातमी सोशल मीडियावर फिरत असल्याने, वाळु माती माफीयांचे अधिक सोईचे झाले आहे, शेतकऱ्यांच्या संगणमताने माती वाळू उपसा उत्खनन जोमाने सुरू आहे, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याची खबर लागत नाही हे मोठे दुर्दैव आहे, लाखो रुपये सरकारी महसूल बुडवून, विना रॉयल्टी बेकायदेशीर अवैधरित्या माती मिश्रित वाळू, मुरुम गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची या भागात मोठी दहशत असल्याने यांच्या विरुद्ध कोणी महसूल अधिकारी गाव कामगार तलाठी मंडल अधिकारी तसेच वरीष्ठ अधिकारी कारवाई करण्यास धजवत नाहीत, राजकीय क्षेत्रातील मोठ्या दबावामुळे मात्र ठोस कारवाई केली जात नाही, किरकोळ कारवाई करुन बोळवणी केली जाते, मात्र, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी माफीयांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई केली असल्याने या भागातील माफीयांचे धाबे दणाणले आहेत. वाचक क्रमांक :