By : Polticalface Team ,29-05-2023
मौजे काशिळ ता, जि, सातारा, गावच्या हद्दीत सोने चांदीचे दागिने कुरियर पार्सल घेऊन पुणे बाजुकडे जात असताना हायवे ब्रिजवर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कडील इनोव्हा गाडी आडवी मारुन, कुरियर पार्सल घेऊन जात असलेल्या इसमांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील २४ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जबरदस्तीने घेऊन पळून गेले असल्याने सदर फिर्यादीने बोरगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर सोने चांदीचे दागिने लुटमारी गुन्ह्यातील आरोपी हे यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण हद्दीत पुणे ते सोलापूर हायवे रोडने इनोव्हा गाडी नं,एम एच ०६ बी एम ३७१८ मधुन आले असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून माहिती मिळाल्याने, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तत्काळ यवत पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाबळे, पोहवा गणेश कचें, राजीव शिंदे, रवींद्र गोसावी, संदिप देवकर, पोना अजित इंगवले, नारायण जाधव, नुतन जाधव, दामोदर होळकर,पोशि, सोमनाथ सुपेकर, सागर शिरसागर, तात्याराम करे, पोशि, टकले, समीर भालेराव, असे पथक तयार करून, कासुर्डी टोल नाका येथे दबंग नाकाबंदी करण्यात आली होती, या दरम्यान सोलापूर बाजूकडे एक इनोव्हा गाडी जात असताना दिसुन आल्याने पथकातील पोलीसांनी हात करुन गाडी बाजुला घेण्याचा इशारा केला असल्याने चालकाने गाडी रोडच्या बाजूला घेऊन सदर गाडीतील ६ आरोपी जवळच्या ऊसामध्ये घुसुन लपण्याचा व पळुन जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कासुर्डी टोल नाका येथील चोर पोलिसांची धावपळ पाहून, एखाद्या चित्रपटातील शूटिंगचे दृश्य साक्षात दिसुन आले, फटाके फुटतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, या घटने परीसरात एकच खळबळ उडाली होती, यवत पोलीसांनी मोठ्या धाडसाने गुन्हेगारांचा पाठलाग करुन आरोपींना पकडले व बेड्या ठोकल्या, त्यांची नावे विचारली असता १) सफराज सलीम नदाफ, ३४ वर्ष, २) मारुती लक्ष्मण मिसाळ, ३१ वर्ष, दोन्ही रा,कुभाजे ता, हातकंणगले, जिल्हा कोल्हापूर, ३) सुरज बाजीराव कांबळे,२४ वर्ष ४) करण सायाजी कांबळे, २३ वर्ष, दोन्ही रा,सावर्डे ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, ५) गौरव सुनील घाडगे, २३ वर्ष रा मिनचे ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, असे त्यांचे नावे सांगुन बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु र नं २००/२०२३, भा द वि कलम ३९५,३४१,३३६, गुन्ह्यातील कबुली दिली, त्यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीतील १८ किलो,५०० प्रेम वजनाचे चांदी तसेच ७९,४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच या गुन्ह्यातील वापरलेले छऱ्याचे पिस्टन चाकु असे हत्यार आणि आरोपींन कडील मोबाईल सह एकुण २४ लाख ७२ हजार ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनसह बोरगाव पोलीस स्टेशन सातारा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे, सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल,मा अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय मा पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण, यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस प्रशासनाने केली आहे. वाचक क्रमांक :