मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर जनतेचे आरोग्य धोक्यात,संबंधितावर गुन्हे दाखल करा शिवसेनेचे मागणी

By : Polticalface Team ,01-06-2023

मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर जनतेचे आरोग्य धोक्यात,संबंधितावर गुन्हे दाखल करा शिवसेनेचे मागणी
करमाळा प्रतिनिधी सध्या मच्छी मारांकडून मासे पकडण्यासाठी शेत तलाव व मोठ्या मोठ्या धरणात पाझर तलावात क्लोरोपायरीफॉस तसेच सायपरमेथ्रीन 25% अशा प्रकारची औषधे पाण्यात सोडली जातात या औषधामुळे मासे बेशुद्ध होऊन किंबहुना काही मृत होऊन वर तरंगत येतात व तात्काळ हे मासे गोळा करून बाजारात विकण्यासाठी आणले जातात त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून अशा पद्धतीने मच्छीमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात दाबावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा पोलीस प्रमुख श्री शिरीष देशपांडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे सध्या काही मच्छीमारांकडून मासे पकडण्यासाठी अघोरी कृत्य करत असल्याचे निदर्शनास येत आहे कमी वेळात भरपूर मासे मिळावेत यासाठी पाण्यात क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथ्रीन 25% अशा प्रकारची औषधे घेतली जातात औषधाचे पाण्यात मिश्रण झाल्यानंतर औषधाच्या स्वभाव गुणधर्मानुसार विषारी गॅस तयार होतो व हा विषारी गॅस पाण्यामार्फत माशांच्या पोटात जाऊन पाच ते सहा तासात मासे बिशुद्ध होतात व हे मासे एका कड्याला तरंगत येतात व मच्छीमार हा सगळा मासा गोळा करून बाजारात तात्काळ विक्री सांगतात क्लोरोपायरीफॉस व सायपरमेथिन हे प्रभावी कीटकनाशक आहे मुख्यता लष्करी अळी मावा तुडतुडे घोंगण यासाठी सर्व पिकांवर हे शेवटचा पर्याय म्हणून औषध वापरले जाते आता या प्रकारामुळे नदीपात्रातील ज्या ज्या ठिकाणी मासे आहेत त्या पाण्याच्या पानवट्यावर दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नाईलाजाने हे वासयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे या औषधाचा परिणाम माशाच्या शरीरावर होत असून मासे खाणाऱ्यांना सुद्धा आरोग्याचा धोका निर्माण होत आहे कोणी गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार चालू असून प्रशासन खात्याला अद्याप याची कसलीही माहिती नाही एका मच्छीमाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की सध्या आमच्या मालकीचे आमच्या ताब्यातील मासे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे नाविलाज आणि तात्काळ सर्व एकाच वेळी मासे पकडण्यासाठी हा प्रकार काही मच्छीमार करत आहेत याबाबत मत्स्यपालन विभागालाही माहिती देऊन तक्रार करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी