राजकीय वैमनस्यातून परस्पर विरोधात गुन्हे दाखल: राजाभाऊ जगताप
By : Polticalface Team ,Wed Oct 27 2021 18:17:16 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा शहरातील आढळगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री किरकोळ गोष्टीला राजकीय वळण लागल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
रात्री बाराच्या दरम्यान आढळगाव रोड वरील एका हॉटेलमध्ये हॉटेल मालक आणि जेवायला आलेल्या गिर्हाईकं मध्ये झालेल्या वादातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल.
तुषार जगताप आणि त्याचा मित्र आढळगाव रोड वरील MJ हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना जेवण आणायला उशीर झाला म्हणून विचारना केली असता राग आल्यामुळे मालक मानव जाधव श्रीगोंदा आणि कामगार विनोद जयस्वाल राहणार नेपाळ आणि इतर दोन यांची जेवायला आलेल्या तुषार जगताप आणि त्यांचा मित्र यांची बाचाबाची झाली बाचाबाचीचे रूपांतर दोन्ही गटांची मारामारी झाले लाथाबुक्क्यांनी तंदूर रोटी काढायच्या लोखंडी सळईने एकमेकांची मारामारी झाली त्यातूनच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत दोन्ही गटांवर परस्पर विरोधी 324 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
आरपीआय तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी पत्रकारांना सांगितले
मला हॉटेल वरून फोन आल्यामुळे मी हॉटेलला गेलो सर्वांना समजून सांगितले भांडण मिटवले होते नंतर काही लोकांनी राजकीय हेवेदावे पोटी जाणीवपूर्वक माझ्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले माझी प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्यासाठी मला या प्रकरणात गोवण्यात आले तपासात ते निष्पन्न होईलच मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :