By : Polticalface Team ,Fri Oct 29 2021 20:02:24 GMT+0530 (India Standard Time)
शेवगाव प्रतिनिधी जमीर शेख:
शेवगाव आगारात एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की शेवगाव एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत असणारे आव्हाणे खु. येथील दिलीप हरिभाऊ काकडे यांनी आगारात उभ्या असलेल्या एम. एच. ४० एन ८८४९ या एसटीच्या मागील बाजुस दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना सुरक्षा कर्मचाऱ्याच्या नजरेस आली.
गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने सर्व बसेस आगारातच उभ्या होत्या. तर कर्मचारी संपावर होते. मयत चालक काकडे हे या दिवशी घरीच होते. पंरतु ते रात्री १० वाजता घरातून बाहेर निघाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, या चालकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून सदर घटनेने एसटी कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
हा प्रकार उघड होताच एसटी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली. सदर मयताचे प्रेत शेवगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे. काकडे यांच्या आत्महत्यांचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. सदर चौकशीला पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :