श्रीगोंदा तालुक्यातील शेतामधून सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयांचा गांजा जप्त
By : Polticalface Team ,Sun Oct 31 2021 15:36:32 GMT+0530 (India Standard Time)
दि.३० रोजी श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई मध्ये हा गांजा जप्त करून दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.३० रोजी गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये शेत जमीन गट नंबर ७००, ७०१यामध्ये लिंबोणीच्या झाडाचे मध्ये गांजाची लागवड केली आहे. सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील दत्तवाडी लोखंडेवाडीच्या मध्ये जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती. सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे दोन इसम यात अरुण हरिभाऊ जगताप ५६ व बाळू हरिभाऊ जगताप वय ५९ दोघे राहणार जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडीचे मध्ये श्रीगोंदा शिवार अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले यावेळेस पोलीस पथका समवेत कृषी अधिकारी व व्हिडीओ चित्रण त्यांनाही पाचारण करण्यात आले होते. सदर छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली यामध्ये एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस अंमलदार केशव व्हरकटे, सागर जंगम, दादासाहेब टाके,अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, गणेश गाडे आदींनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद