कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी

By : Polticalface Team ,Thu Nov 04 2021 16:03:46 GMT+0530 (India Standard Time)

कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी प्रतिनिधी: दूरगाव मधील ग्रामस्थांनी झाडांना आकाश कंदील लावून दिवाळी साजरी केली. आज लक्ष्मी पूजन व नरक चतुर्दशी च्या मुहूर्तावर ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. माझी वसुंधरा व समृद्ध गाव योजना अंतर्गत वृक्षलागवड आणि घनवन केले आहे त्या ठिकाणी झाडांना आकाश कंदील बांधून दिवाळी साजरी करून शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळी हा असाच एक सण. या सणांचा राजा म्हणून दिवाळी सणाला संबोधले जाते. संपूर्ण देशभर धूमधडाक्यात सण साजरा होतो. लहान-थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या सणात सहभागी होऊन आनंद लुटत असतात. म्हणून तर म्हणतात..‘‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा!’’ दिवाळी म्हणजे आनंदाची उधळण, आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेतले की, त्या सणाचा आनंद द्विगुणित होतो. तेव्हाच ख-या अर्थाने दिवाळी साजरी होते. या पारंपरिक सणाची उंची वाढविण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. सामाजिक भान ठेवून आपण सर्वानी हा सण साजरा केला तर अद्वितीय असा आनंद तर होईलच; शिवाय पर्यावरणाची हानी कमी होऊन वसुंधरेला ग्लोबल वार्मिगच्या विळख्यातून वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलल्याचे समाधान आपल्याला लाभेल. नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी त्याचबरोबर समाजप्रबोधनाचे कार्य सर्वांनी प्रामाणिकपणे केले तर समाजपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर हे काम कठीण नाही. चला तर आपण सर्वानी मिळून पर्यावरणपूरक व पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करूया व सर्वानी दिवाळीचा भरपूर आनंद लुटूया. आनंदाचे डोही आनंद तरंग होऊ या! दिवाळी मध्ये आपण रोषणाई म्हणून दिवे लावतो तसेच किमान आपल्या अंगणात एक तरी झाड लावून आपले भविष्य निरोगी ठेवूया..! असे अहवान अशोक जायभाय यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद