By : Polticalface Team ,Mon Nov 08 2021 18:30:41 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी: नौकरी अथवा काम धंद्या निमित्त सतत बाहेरगावी असणारे पेडगावातील सुपुत्र सुट्टीच्या निमित्तान गावी आलेले असतात. शाळेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जण आपलं करियर घडवण्यासाठी नोकरीच्या निमित्तानं अनेक शहरांमध्ये स्थाईक झालेले असतात. काँलेजमध्ये आसताना घासतला घास खाणारे मित्र आनेक वर्षे एकमेकांना भेटत नाहीत. पेडगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावतील अशा लोकांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करून एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला. या निमित्ताने गावातील सुपुत्र अनेक वर्षांनी एकत्रित जमले. एकमेकांच्या गाठीभेटी व हितगुज झाले. एकमेकांच्या खुशालीची चर्चा झाली. कोरोनाच्या जीवघेण्या संकटा नंतर एकमेकांचे जिवलग मित्र अनेक वर्षां नंतर भेटल्या मुळे अनेकांना भारावून आले. पेडगाव ग्रामपंचायतीने काल सायंकाळी पाच वाजता पेडगावाचा मान शान आणि आभिमान आसणाऱ्या या शिलेदाराचा स्नेह मेळाव्यात सर्वांचा यथोचित सत्कार केला. सरपंच भगवानआप्पा कणसे यांनी सर्वांची अस्तेने विचार पूस केली. आपण करत असलेल्या क्षेत्रांत प्रगती करा.आपल्या बरोबर गावचे नावंही उज्जवल करा. पेडगावतचे सुपुत्र म्हणून आम्हाला आपला गर्व आणि अभिमान वाटतो. असे गौरव उद्गार भगवान आप्पा कणसे यांनी काढले.
मायभूमीतल्या या सत्कार आणि कौतुकाने अनेक जण भारावून गेले. दरवर्षी असा मेळावा केला जावा असे प्रत्येकाने सूचना केली. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या या शिलेदारांच्या पंखात ज्या पेडगावच्या मातीने बळ दिले त्या माय भूमीचे पांग फेडण्यासाठी म्हणून अनेकांनी छत्रपती संभाजी विद्यालयाच्या चालू असलेल्या इमारत बांधकामासाठी पाच हजारा पासून पंचवीस हजारा पर्यंत मदत जाहीर केली. आपल्या माय भूमीसाठी स्वतःच्या मनाने मदतीचा हात पुढे करणाऱ्या या शिलेदाराचा दिलदार पणा पाहून सरपंचाना आनंद अश्रु अनावर झाले. संभाजी विद्यालयाच्या इमारती साठी स्वंय पूर्तीने केलेल्या मदती बद्दल सरपंच भगवान कणसे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे अंतकरणापासून आभार मानले.
कार्यक्रमास मोठया संख्येने बाहेर गावी राहणारे सुपुत्र, ग्रामपंचायतचे पदाअधीकारी, सेवकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :