बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला आनंदवाडी गावचा आरोग्य उपकेंद्र मंजुरी चा प्रश्न आज सुटला.
By : Polticalface Team ,Tue Nov 09 2021 21:35:43 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी(अमोल झेंडे): तालुक्याचे आमदार व माजी मंत्री बबनरावजी दादा पाचपुते आणि आढळगव गटाच्या कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्या पंचशीलाताई रमेशतात्या गिरमकर यांच्या संयुक्त प्रयत्नाचे आनंदवाडी गावातील आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळाली. वारंवार पाठपुरावा,सतत कागदपत्रांची पूर्तता आणि सामाजिक बांधिलकी जपत चालू ठेवलेल्या संघर्षाला आज यश आले.
गावच्या उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी जवळ जवळ १ कोटी रुपयांचा निधी गावाला मिळवून दिला.
आरोग्य उपकेंद्र मंजुरी मिळताच आनंदवाडी ग्रामपंचायत ने तात्काळ एक इमारत दुरुस्ती करून आजपासूनच त्यामध्ये दवाखान्याचे कामकाज करण्यास उपलब्ध करून दिली.
या उद्घानप्रसंगी प्रतिभाताई पाचपुते अध्यक्षा. परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी, पंचशीलाताई रमेशतात्या गिरमकर जि. प. सदस्या अहमदनगर, रमेश तात्या गिरमकर माजी उपसरपंच आनंदवाडी, शंकर अण्णा कोठारी उप. सभापती श्रीगोंदा पंचायत समिती, डॉ नितीन खामकर वैद्यकीय अधिकारी श्रीगोंदा तालुका, सुदामराव नलावडे सरपंच ग्रामपंचायत आनंदवाडी, गणेश (विकी) गिरमकर उपसरपंच ग्रामपंचायत आनंदवाडी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :