आज गुरुवारी 15 जून रोजी माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शाळांची जिल्ह्यात घंटा वाजणार
By : Polticalface Team ,14-06-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- गुरुवारी 15 जून रोजी माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शाळांची घंटा वाजणार असून पालक विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी लगभग सुरू झालेली दिसते. दरम्यान विद्यार्थ्यांची आठवडाभरापासून शालेय साहित्यासह गणवेश शिक्षण घेण्यासाठी एसटी पास इत्यादींची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान सन 2022- 23 हे शैक्षणिक वर्ष संपवून आता 2023 -24 हे शैक्षणिक वर्ष शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक विद्यार्थ्यांची मोठी लगभग सुरू आहे. नुकताच मागील आठवड्यात इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल झाला. काल 14 जून रोजी एसएससी बोर्डाकडून मार्च- 23 परीक्षेच्या निकालाचे जिल्ह्यात तालुका स्तरावरील केंद्रांमध्ये ज्या त्या विद्यालयांच्या निकालाचे वाटप करण्यात आले. जे विद्यार्थी एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. ते विद्यार्थी पालकांसमवेत अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये पुढील शिक्षणासाठी विचारपूस करताना दिसत आहेत. मेरिट लिस्ट नुसार आता ज्या त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणा क्रमांकाचा प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच पालक विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी मोठी उत्सुकता लागली आहे.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे उद्या शाळा प्रशासन मोफत पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. त्यामुळे जवळपास दीड महिन्यानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत दाखल होणार आहेत. दरम्यान मार्च- 2023 चा एसएससी बोर्डाचा राज्यात उत्कृष्ट निकाल लागला. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेक विद्यालयांचा जवळपास शंभर टक्के निकाल लागल्याने संस्थाचालक, शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून, आता नव्याने 2023- 24 हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षाचा देखील एसएससी परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागेल, अशी अपेक्षा पालक वर्गांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या त्या विद्यालयातील शिक्षकांना आता ज्यादा तासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे शिक्षण मिळावे असे पालक वर्गात मधून अपेक्षा आहे.
त्यामुळे उद्या 15 जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी आपापली शालेय साहित्य खरेदी करून शाळांमध्ये प्रवेश करणार आहेत. विद्यालयांनी देखील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जयत तयारी केल्याचे दिसते. चालू वर्षी उन्हाळी हंगाम अत्यंत लाही लाही करणारा ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या पालकांसमवेत सुट्टीच्या कालावधीमध्ये थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक म्हणून मोठा आस्वाद घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील पोहण्याचा आनंद लुटला. आता उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने अभ्यास एके अभ्यास गुरुजनांनी आठ तासात शिकविलेले वर्ग पाठातील गृहपाठात रूपांतर करण्यासाठी दिलेला अभ्यास त्याचे पाठांतर करावे लागणार आहे. त्यामुळे 15 जून हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षासाठी आनंदा बरोबरच बुद्धी कौशल्याचा ठरणार आहे. तालुक्यातील सर्व संस्थाचालक व शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
वाचक क्रमांक :